कोविड केंद्रामधून पळून गेलेला रुग्ण अखेर सापडला

0
97

मारेगाव प्रतिनिधी उमर शरीफ
यवतमाळ (दि 30जुलै)मारेगाव येथील कोविड केंद्रामधून पळून गेलेला रुग्णअखेर मारेगाव जवळील एका शेतामध्ये आढळून आल्याने पोलीस प्रशासनासोबतच आरोग्य तसेच महसूल विभागाने सुटकेचा श्वास सोडलेला आहे.
काल पहाटेच्या वेळेस मारेगाव येथील कोविड केंद्रातून एका पॉझिटीव्ह रुग्णाने पळ काढला. त्यामुळे पोलीस विभाग, महसूल विभाग, नगरपंचायत, तसेच आरोग्य विभाग या सर्वांचे धाबे दणाणले. या रुग्णाला शोधण्यासाठी प्रशासनाने अखेर प्रयत्न करीत शोधून काढले. तो मदनापूर जवळील एका शेतामध्ये लपून असल्याचे एका शेतकऱ्याला दिसले. या शेतकऱ्याने
गावातील पोलीस पाटलाला याविषयी माहिती दिली. या पोलीस पाटलांनी मारेगाव पोलिसांना याविषयी तात्काळ माहिती देताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत कोविड रुग्णाला ताब्यात घेतले.पळून जाण्याविषयी त्याला विचारले असता त्यांनी सांगितले की माझ्या घरी जनावरे असल्याने मला त्या जनावरांची काळजी असल्यानेच मी पळून गेलो होतो असे तो म्हणाला. त्याला सध्या मारेगाव येथीलच कोविड केंद्रामध्ये ठेवण्यात आलेले आहे.
: या कारवाईमध्ये पो.नि. जगदिश मंडलवार, पो.उपनिरीक्षक अमोल चौधरी, पोलीस नाईक इकबाल शेख, राजू टेकाम, किशोर आडे, जमादार चलाख यांनी सहभाग नोंदवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here