सँनिटायझर मशीन नागरिकांसाठी आरोग्यकवच – संजय गजपुरे

0
73
चंद्रपूर
         कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जेव्हापासून टाळेबंदी सुरु झाली तेव्हापासून भारतीय जनता पक्षाचे माध्यमातून आम्ही मदतकार्य सुरु केले. आज लोकनेते व विकासपुरुष  आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवस जिल्हा भाजपा ” सेवादिन ” म्हणून साजरा करीत आहे. आज लोकार्पण करण्यात आलेले आँटोमँटिक सँनिटायझर मशीन हे कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांसाठी आरोग्यकवच असल्याचे प्रतिपादन जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांनी केले.
           लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त नागभीड येथील गो.वा.महाविद्यालयातील कोविद केअर सेंटर व प्राथमिक आरोग्य केंद्र , बाळापुर ( बुज.) येथे संजय गजपुरे यांच्या सौजन्याने आँटोमँटिक सँनिटायझर मशीन चे लोकार्पण करण्यात आले. नागभीड येथे नगराध्यक्ष प्रा.डॉ. उमाजी हिरे यांच्या हस्ते व न.प.उपाध्यक्ष गणेश तर्वेकर , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, डॉ. मुंगणकर, डॉ. कु.आखाडे , पत्रकार अरुण गायकवाड , माजी ग्रा.पं.सदस्य मनोज कोहाड  , प्रविण बंडावार यांच्या उपस्थितीत हे लोकार्पण पार पडले.
               बाळापुर ( बुज.) येथील लोकार्पण जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. चाचेरे , डॉ. हिवरकर , डॉ. मदन अवघडे , क्रुउबास उपसभापती रमेश पाटील बोरकर , माजी भाजपा तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम , जि.प.सर्कल प्रमुख धनराज बावणकर , चंद्रपूर जिल्हा सरपंच सेवा महासंघाचे अध्यक्ष हेमंत लांजेवार , गंगासागर हेटी चे सरपंच दिलिप गायकवाड ,शांताराम मडावी,  राजु गुरपुडे , बाळापुर चे ग्रामसेवक डेव्हीड मेश्राम , रमेश फुलझेले , आनंद शेंडे यांच्यासह केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी व आशा सेविका उपस्थित होत्या. याप्रसंगी उपस्थितांना बिस्किटे व साबणाचे वितरण करण्यात आले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here