शरद पवार विचार मंच वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

108

चंद्रपूर

शरद पवार विचार मंच जिल्हा चंद्रपूर, श्री विद्या कोचिंग क्लासेस,समाधी वॉर्ड चंद्रपूर, स्टुडंट्स केअर इन्स्टिट्यूट, गांधी ,चौक चंद्रपूर तर्फे दहावीच्या बॉर्ड परीक्षेत, विद्यार्थ्यांनी त्यांच्या अथक परिश्रमाने गुणवत्ता यादीत नाव प्राप्त केले असून , त्यांनी त्यांचे आईवडील,शिक्षकवृंद, मारडा गावचे (छोटा/ मोठा) नावलौकिक केले आहे.आज दिनांक 30 जुलै 2020 रोजी अश्या ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन करण्यात आला. (आरवट इथिल कु. रक्षा गावंडे,96.80% , मारडा इथिल कु.सुहानी गोरे,90%, कु.पल्लवी अडबाले 82%, कु. अनुश्री ऊरकुडे 80%,कु. रोहिणी पिंपळशेंडे 77%, कु श्रुतिका माकोडे,74% कु.अंजली वांढरे 64% )शरद पवार विचार मंच प्रदेशाध्यक्ष श्री अमित ढमाळ यांच्या मार्गदर्शनात , शरद पवार विचार मंचाचे प्रदेश उपाध्यक्ष शशीकांत देशकर यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आला असून यावेळी श्री विद्या कोचिंग क्लासेसचे संचालक संजय तुरीले,मारडा गावातील प्रतिष्ठित नागरिक संजय अडबाले , गुणवंत विद्यार्थी तसेच पालकगण उपस्थित होते.विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्जवल भविष्यकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.