जिल्ह्यात 5 हजार कोरोना बाधितांचा आकडा वाढण्याची भीती : मनसे महिला सेना अध्यक्षा गायकवाड यांच्या प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना

84

चंद्रपूर – जगात कोरोना विषाणूचा सर्वत्र हाहाकार सुरू आहे, जेव्हा देशात कोरोना रुग्ण वाढत होते त्यावेळी चंद्रपूर जिल्ह्यात एकही बाधित आढळून आला नाही मात्र 2 मे ला पहिला बाधित हा शहरात आढळला होता.
आज 3 महिन्यांतच बधितांचा आकडा 500 जवळ पोहचला आहे, जर याप्रकारे रुग्णांची संख्या वाढत राहली तर जिल्ह्यात 5 हजारांचा बाधित आकडा लवकरच वाढण्याची भीती आहे.
यावर प्रशासनाने सखोल अभ्यास करून परिस्थिती कशी हाताळता येईल यावर नियोजन करने आवश्यक आहे.
जेणेकरून शहरात व जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची पाळी प्रशासनावर येणार नाही,

एकीकडे लॉकडाऊन मुळे गोर गरिबांना कामधंदा बंद असल्याने
दोन वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही.तर दुसरीकडे प्रशासनाने कडक नियम हे सर्वसामान्य नागरिकांवर लागू होत केली आहे , मास्क नसेल तर दंड, कामाशिवाय बाहेर पडू नका, नियम तर शहरातील नागरिक व्यवस्थित पाळत आहे मग जे बाहेरून येजा करीत आहे ते नियम पाळत आहे का? त्यांच्यामुळे आज जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला.
जर नागरिक असेच जिल्हाबाहेर प्रवास करून येणं जाणं करीत असणार तर या जिल्हाबंदीचा काय उपयोग?
30 जुलैला 9 दिवसांच्या चिमुकलीला कोरोनाची बाधा झाली याला जबाबदार कोण? नियम पाळणारे की बाहेरून येणारे?
स्थानिक प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर एक महिन्यासाठी जिल्हा बाहेर येणं व जाणे थांबविले तर या विषाणूवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येणार, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवावी ज्या नागरिकांना आरोग्याविषयी तक्रार असेल त्यांनीच फक्त जिल्हाबाहेर जावे अशी नियमावली प्रशासनाने बनवावी.
बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे हा विषाणू पसरत आहे तर जिल्ह्यातील जे नागरिक नियम पाळतात त्यांच्यावर हा लॉकडाऊन चा निर्णय लादणे योग्य नाही, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे ही एक विनंती आहे हा प्रयोग एकदा करून बघा.
जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायला गेलेल्या शिष्टमंडळात मनसे महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, जिल्हा सचिव अर्चना आमटे, जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, शहर सचिव फिरोज शेख, शहर उपाध्यक्ष विमल लांडगे, शहर उपाध्यक्ष प्रीती रामटेके, शहर उपाध्यक्ष शकुंतला रंगारी, विभाग अध्यक्ष वंदना वाघमारे, नीता बांगडे आदी उपस्थित होते.