शिव भोजन केंद्रात निकृष्ठ दर्जाचे भोजन

0
89

 

घुगूस

शिव भोजन केंद्रात निकृष्ठ दर्जाचे भोजन* (घुग्गुस ) महाराष्ट्र शासनाने गोर गरीब नागरिकांना भोजन मिळावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात पाच रुपयात भोजन देण्याचे ठरविले तसेच हे शिवभोजन रेल्वे परिसर ,बसस्थानक, बाजारपेठ, शासकीय इमारत,व जिल्हा रुग्णालये या ठिकाणी दुपारी बारा ते दोन च्या वेळात देण्याचा शासनाचा नियम आहे घुग्गुस येथे सुद्धा श्रीराम वॉर्डात रमाबाई महिला बचत गटाला शिव भोजन केंद्र देण्यात आले असून या शिव भोजन केंद्रातुन बाळा ठाकरे नामक व्यक्तींनी पार्सल भोजन घरी नेले व मुलाला जेवण दिले असता त्याला भाजी मध्ये अळ्या आढळून आल्या याची माहिती त्यांनी वडिलांना दिली व त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांना दिली असता त्यांनी येथील शिवसेना शहर प्रमुख बंटी भाऊ घोरपडे यांना माहिती दिली त्यांनी शिवसैनिकाना घेऊन शिव भोजन केंद्रात धडक देऊन विचारणा केली असता चुकी झाली आहे यापुढे असे होणार नाही असे सांगितले यावेळी युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे, शिवसेना उपतालुका प्रमुख गणेश शेंडे, बाळू चिकनकर, प्रकाश मेहता, चेतन बोबडे,महेश शेंडे, सुरज चिकनकर , निखिल मोहितकर,व शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here