युवतींनी क्रीडा क्षेत्राकडे वळावे : आ. प्रतिभाताई धानोरकर*

0
84

 

चंद्रपूर :

क्रीडा क्षेत्राकडे आपल्या भागातील युवती फारशा दिसून येत नाही. आता येत्या काळात नोकरीच्या संधी म्हणून युवतींनी क्रीडा क्षेत्राकडे वळावे असे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले आहे.

प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे राहायला हव्या. या विधानसभा क्षेत्रातील आमदार देखील पहिल्यांदा महिला मिळाली आहे. त्यामुळे या विधानसभा क्षेत्रात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रात देखील महिलांनी पुढे यावे असे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. त्या तालुका क्रीडा संकुल समितीतर्फे घेण्यात आलेल्या आढावा सभेच्या वेळी बोलत होत्या.

अलीकडेच १० वि , १२ वि मध्ये मुलीच्या गुणवत्तेच्या टक्का मोठा आहे. त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या भागातील मातीत जन्मलेल्या मुली येत्या काळात या भागाचंच नाव नाहीतर देशाच नाव जगाच्या नकाशावर कोरतील. त्याकरिता लागणारे क्रीडा क्षेत्रातील पोषक वातावरण तयार करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिले.

आज तालुका क्रीडा संकुल समिती, वरोरा व तालुका क्रीडा संकुल, भद्रावती ची सभा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद सभागृह, भद्रावती येथे सपन्न झाली. सदर सभेस  नगराध्यक्ष नगरपरिषद,भद्रावती अनिल धानोरकर,  तहसीलदार सचिन गोसावी, तहसीलदार महेश शितोडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुश्ताक,  मुख्याधिकारी, न.प.भद्रावती सूर्यकांत पिसदूरकर, पोलिस निरीक्षक, भद्रावती सुनीलसिंग पवार, देरकर, , उपविभागीय अभियंता एस.बी.कांबळे, गट विकास अधिकारी संजय बोदेले, गट शिक्षण अधिकारी रुपेश कांबळे,  विस्तार अधिकारी विजय भोयर, मंगेश आरेवार, प्रफुल चटकी, राकेश तिवारी, नगरसेवक संतोष आमने,  नगरसेवक चंद्रकांत खारकर,  नगरसेवक विनोद वानखेडे तसेच सभेतील सर्व सदस्यगण उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here