गोंडपिपरी काँग्रेस ओबीसी सेल तालुका अध्यक्षपदी प्रा. रमेश हुलके यांची निवड

142

 

गोंडपिपरी -:

स्थानिक विश्रामगृह येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुका काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत तालुका पदाधिकारी यांच्या शिफारसीने प्रा. रमेश हूलके यांची सामाजिक कार्यतत्परता व धडपड पाहून गोंडपिपरी काँग्रेस कमिटीच्या ओबीसी सेल तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राजुरा नगराध्यक्ष अरुण भाऊ धोटे यांचा नुकताच गोंडपिपरी तालुका दौरा संपन्न झाला. याच दरम्यान स्थानिक विश्रामगृहात तालुका काँग्रेस कमिटीचे आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी प्रामुख्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्याचा राजुरा नगराध्यक्ष अरुण भाऊ धोटे, गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तुकाराम झाडे, अनिल झाडे, रामचंद्र कुरवर टकर, नगरसेवक प्रदीप झाडे, प्रवीण नरहर शेट्टी वार, वासू नगारे, बबलू कुळमेथे, प्रदीप ईटेकर प्रामुख्याने उपस्थित होते. याच प्रसंगी तालुक्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात हिरीरीने कामगिरी करणाऱ्या प्रा. रमेश हुलके यांची गोंडपिपरी तालुका काँग्रेस ओबीसी सेल तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. प्राध्यापक रमेश हुलके यांच्या निवडीमुळे तालुक्यातील ओबीसी प्रवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.