मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना राखी पाठवल्या

0
97

 

चंद्रपुर

: विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळातील महिला शिक्षकांनी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना राखी पाठवून रक्षा करण्याची मागणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून विनाअनुदानित शाळांना आणि त्यातील शिक्षकांना अनुदान-वेतन दिलं गेलेलं नाही. शिक्षक संघटना यासाठी वारंवार राज्यभर आंदोलनं करीत आहेत. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. विद्यादानाचे महत्त्वाचे कार्य तुटपुंज्या मानधनात हे शिक्षक करीत आहेत. गेल्या 20 वर्षांपासून या शिक्षकांची प्रतीक्षा सुरू आहे. त्यामुळं आज रक्षाबंधनाच्या दिवसाचं औचित्य साधून महिला शिक्षकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी पाठवल्या आणि अनुदान मंजूर करून बहिणींची रक्षा करण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here