रुग्णालयातील महिला कामगाराच्या मृत्यूने वातावरण चिघळले

0
89

चंद्रपूर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या संगीता पाटील यांना काल दिनांक चार ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान दरम्यान हृदयविकाराचा झटका आला.त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागामध्ये भरती करण्यात आले.त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचे निधन झाले.विशेष म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांना नियमितपणे दर महिन्याला पगार दिला जात नाही.काही दिवसापूर्वी दोन टप्प्यांमध्ये कामगारांचे थकीत पगार दिले.परंतु पुन्हा पाच महिन्याचे पगार थकीत असल्याने कामगारांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. अशातच संगीता पाटील यांच्या पतीचा सहा महिन्यापूर्वी मृत्यू सुद्धा झालेला होता. त्यांना प्रचंड आर्थिक अडचण असल्यामुळे त्या दररोज सहकारी कामगारांना पगाराविषयी विचारणा करित होत्या.आज अखेर मानसिक तणावामुळे त्यांना जीव गमवावा लाछला असा आरोप जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केला.संगीता पाटील यांच्या मृत्यूने सर्व कामगार संतप्त झाले. त्यांनी रुग्णालयात ठिय्या मांडला. यानंतर आमदार किशोर कामगार, नगरसेवक पप्पू देशमुख अधिष्ठाता डॉ.सुरपाम यांची याची अतिदक्षता विभागातील कार्यालयात बैठक झाली.
बैठकीमध्ये कामगार महिलेच्या अनाथ मुलाचे पालकत्व स्विकारणाऱ्या जवळच्या नातेवाईकाला कंत्राटी पद्धतीने नोकरी देण्याचा निर्णय झाला.सोबतच एक लाख रुपये मुलाच्या खात्यामध्ये फिक्स डिपॉझिट करण्याचे ठरविण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सध्या कंत्राट रद्द झाल्याने थेट वैद्यकीय महाविद्यालयातील निधीतून अर्थसहाय्य करण्याची मागणी करण्यात आली.मात्र निधी नसल्यामुळे केवळ पंचवीस हजार रुपये देणे शक्‍य असल्याचे अधिष्ठाता यांनी सांगितले. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी 25000 रुपये मदत जाहीर केली तसेच डॉ. सुरपाम यांनी 40000 जन विकास कामगार संघा तर्फे अध्यक्ष देशमुख यांनी 10000 रुपये देण्याचे जाहीर केले. एकूण एक लाख रुपये कामगार महिलेच्या मुलाच्या नावावर फिक्स डिपाॅजिट करण्यात येणार आहे. त्यानंतर पाटील यांचा मृतदेह पोस्टमार्टम साठी नेण्यात आलामात्र पाटील यांच्या मृत्यू नसून वैद्यकीय शिक्षण विभागाने केलेला खून आहे. सहा-सहा महिने पगार नसल्याने कामगारांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो.
विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here