कर्तव्यावर असतांना मृत्यु झालेल्या आरोग्य सेविकेच्या कुटुंबातील सदस्याला नौकरीत द्या

0
124

चंद्रपुर
कंत्राटी पध्दतीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असलेल्या संगीता पाटील यांचा कर्तव्यावर असतांनाच मृत झाल्याची घटना काल मंगळवारी घडली. उपचाराअभावी सदर महिला कर्मचा-याच्या मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान आज बुधवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी रुग्णालयाला भेट देत सदर घटणेची माहिती घेतली असून मृत महिला कर्मचा-याच्या कुटुंबातील एका सदस्याला तात्काळ नौकरी देण्याचे निर्देश दिले आहे. तसेच मृत महिलेला तात्काळ २५ हजारांची तात्काळ आर्थिक मदत दिली आहे. यावेळी जनविकास सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू देशमूख, कामगार युनियनचे अॅड. शैलेश मुंजे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुरपाम, निवासी वैद्यकीय अधिकारी भास्कर सोनारकर, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, डॉ. अनंत हजारे आदिंची उपस्थिती होती.

जिल्हा सामन्य रुग्णालयात कंत्राटी पध्दतीवर काम करणा-या कर्मचा-यांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहे. मात्र ते सोडविण्याच्या दिशेने आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न सुरु आहे. या संदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमूख यांच्याशी आमदार किशोर जोरगेवार यांचा सतत पाठपूरावा सुरु आहे. दरम्यान येथेच कर्तव्यावर असतांना महिला कर्मचाऱ्याला हृद्यय विकाराचा झटका आल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उचाराकरीता दाखल करण्यात आले. उपचारा दरम्याण तिचा मृत्यू झाला. मात्र योग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप केल्या जात आहे. त्यामूळे कंत्राटीपध्दतीवर काम करणा-या कर्मचा-यांमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला आहे. दरम्याण आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट घेत सदर प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेत घडलेल्या प्रकाराबाबत चांगलीच नाराजगी व्यक्त केली. यावेळी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषी आढळल्यास सदर व्यक्तीवर कारवाई करण्याच्या सुचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्यात. तसेच मृत महिला कर्मचा-याला तात्काळ २५ हजारांची मदत केली. सदर कर्मचा-याचे वेतनही तात्काळ देण्याचे निर्देशही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिलेत. तसेच सदर महिला ही घरची कर्ता असल्याने परिवारावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामूळे सदर महिलेच्या कूटुंबातील एका सदस्याला नौकरीत सामावून घेण्याच्याही निर्देश यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहे. कोरोनाच्या कठीण काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर महत्वाची भूमीका बजावत आहे. मात्र इतर रुग्ण व कर्मचा-यांकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच येथील कंत्राटी कर्मचा-याच्या समस्या मार्गी काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमीत देशमूख यांच्याश चर्चा करण्यार असल्याचेही आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here