वयाचे शतक पूर्ण करणाऱ्या वृद्धाचे निधन*

0
100

चंद्रपूर:-
भारतीय आयुर्मानानुसार अनेक व्यक्ती अगदी कमी वयात स्वर्गवासी होतात. त्यात एखादया व्यक्तीने वयाची सेंचुरी मारली असेल तर नवल वाटणारच. अशाच वयाची शंभरी पार करणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीचे निधन 101 वर्षे 3 महिन्यांनी होण्याची घटना दि.4 आगस्ट रोजी पहाटे 3 वाजता भद्रावती तालुक्यातील मुधोली येथे घडली.
कवडु गंगाराम जांभुळे असे या वृद्धा चे नाव असुन मंगळवारी पहाटे 3 वाजता त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते 101 वर्षे 3 महिन्याचे होते. 1 आगस्ट 1919 ही त्यांच्या जन्म झालं. ते व्यवसायाने शेतकरी असलेल्या कवडु जांभुळे यांचे चौथी पर्यत शिक्षण चोरा या खेडेगावात झाले. त्यानंतर सातवीपर्यंतचे शिक्षण भद्रावती येथे झाले. ते 1950 ते 60 या काळात मुधोलीचे सरपंच राहिले आहेत. 1962 ते 72 प्रशासकीय न्याय पंच ,1973 ते 75 पर्यत विविध कार्यकारी सहकारी संस्था मुधोली चे सभापती ,चंदनखेडा आदिवासी सहकारी संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य केले आहे.तसेच ते नाटक ,भजन व शंकरपट प्रेमी होते. त्यांच्या पश्चात 3 मुले, 4 मुली ,सूना, जावई व नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. मुधोली येथील मोक्षधामात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here