पुण्यनगरी दैनिकाचे संस्थापक मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांचे निधन

0
130

पुण्यनगरी या लोकप्रिय दैनिकाचे संस्थापक तथा मालक मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांचे वयाच्या 83 वर्षी वृध्दापकाळानं निधन झाले
शिंगोटे हे मुळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील गायमुखवाडी येथील होते.दै. पुण्यनगरी, मुंबई चौफेर, आपला वार्ताहर, यशोभुमी, कर्नाटक मल्लासह इतर काही ‘अग्रगण्य’ दैनिक त्यांनी सुरु केली होती.
वृत्तपत्र क्षेत्रातील अनुभवाची शिदोरी ताब्यात असलेल्या शिंगोटेंना आपलेही एखादे दैनिक असावे याबाबतचा विचार मनात रुंजी घालू लागला.
त्यानुसार त्यांनी 1999-2000 च्या दरम्यान मुंबई चौफेर हे टॅब्लॉईड सायंदैनिक सुरु केले. त्यानंतर आपला वार्ताहर, पुण्यनगरी, हिंदमाता, कर्नाटक मल्ला ही दैनिके कोणतेही भांडवल पाठिशी नसताना फक्त वाचकांच्या जोरावर शिंगोटेंनी सुरु केली होती.
यातील पुण्यनगरी दैनिक महाराष्ट्रातील वृत्तपत्र क्षेत्रातील मैलाचे दगड ठरले. पश्‍चिम महाराष्ट्र, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ याठिकाणी दैनिक पुण्यनगरीच्या जिल्हावार आवृत्त्या आहेत.
खपाच्या दृष्टिकोनातून पुण्यनगरीने आपला स्वतंत्र असा वाचकवर्ग तयार केला आहे. 2002-3 ला सुरु झालेल्या या दैनिकाने अल्पावधीतच यश संपादन केले, हे केवळ मुरलीधर शिंगोटे यांच्या अनुभवामुळेचसाधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा नियम शिंगोटे यांनी तंतोतंत पाळला. एवढ्या मोठ्या वृत्तपत्राचे मालक असुनसुद्धा शिंगोटे यांनी खोट्या व बेगडी प्रसिद्धीला कधीच थारा दिला नाही. भूक लागली तर प्रसंगी वडापावच्या गाडीवर थांबून वडापाव खाणारा हा माणूस.कुठल्याही भांडवलदारी शेठजी-भटजींची हुजूरेगिरी न करता शिंगोटेंनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा मराठी वृत्तपत्रसृष्टिमध्ये उमटवला होता.
करण्यात बाबांचे मोठे योगदान आहे. वृत्तपत्र विक्रेता ते महाराष्ट्रा तील वृत्तपत्र समुहाचे मालक असा त्यांचा प्रवास मराठी माणसाला प्रेरणादायी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here