निरली : श्रमदानातून केली रस्त्याची दुरुस्ती

115

राजुरा
निरली गाव परिसरात मागील महिनाभराच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाले, अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेताला जायच्या मुख्य पांदण रस्ता पूर्णतः उध्वस्त झाला. या रस्त्याने जाणारी बैलगाडी कधी उलटणार हे सांगता येत नव्हतं. नक्कीच नुकसान होणारी परिस्तिथी तयार झाली होती.बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींना गावकर्यांनी रस्त्याच्या परिस्थितीची ।माहिती दिली पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले , म्हणून निरली गावातील युवा पिढी कोणाचीही वाट न पाहता जागृत झाली आपल्या श्रमदानातून काही तासात रस्ता बनवला. होय हे एकीचे बळ होय, कुणाचाही हेवा न करता अगदी आपली जबाबदारी समजून युवकांनी परिश्रम केले आणि संकटावर मात केली. नक्कीच हे आदर्श उदाहरण आहे.गावातील युवकांनी एकत्र येऊन केलेल्या कार्याचे निरली व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे .या कामासाठी रामा धांडे, विजय धांडे, सचिन धांडे, प्रदीप दुबे, संजय उमरे, मिलिंद पाटील,बाबाराव उमरे,पंकज दुबे, स्वप्नील क्षीरसागर आणि राजेश धांडे यांनी परिश्रम घेतले.