बल्लारपूर : शहरात भर चौकात गोळीबार, एक मृत

0
129

बल्लारपूर
शहरातील भर चौकात वर्दळीच्या बस स्टॅन्ड परिसरात बल्लारपूर कडून बामणी कडे जात असताना चारचाकी गाडीत बसून जात असताना सुरज बहुरिया नामक युवकावर भर भर चौकात गोळीबार झाला असल्याची घटना आज दुपारी घडल्याने परिसरात प्रचंड तणाव आहे.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ घटात परीसर ताब्यात घेतला असून प्रतिदर्शीनुसार सुरज बहुरिया वर अंदाजे 5-6 गोळ्या झाडण्यात आल्या असल्याने तात्काळ चंद्रपूर रुग्णालयात पाठविण्यात आले असता मृत घोषित करण्यात आले.
बल्लारपूर शहरात गुंड प्रवृत्तीच्या विरोधीगटात सातत्याने वाढते गँग वॉर चिंतेचा विषय आहे. हे गोळीबार प्रकरण सुद्धा याच गँग वॉर चा भाग व व्यावसायिक प्रतिस्पर्धा माध्यमातून असल्याचे चर्चेत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here