बल्हारपूर : पोलिसांनी लाठीचार्ज करत बहुरिया समर्थकांचा जमाव पांगविले

0
158

बल्लारपूर

शहरातील जुना बस स्टॅन्ड परिसरात बल्लारपूर कडून बामणी कडे जात असताना चारचाकी गाडीत बसून जात असताना अवैध कोळसा व्यापारी सुरज बहुरिया नामक युवकावर भर भर चौकात गोळीबार झाला असल्याची घटना आज 8 ऑगस्ट च्या दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडल्याने परिसरात प्रचंड तणाव आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत  परीसर ताब्यात घेतला असून प्रतिदर्शीनुसार सुरज बहुरिया वर अंदाजे 5-6 गोळ्या झाडण्यात आल्या असल्याने तात्काळ चंद्रपूर रुग्णालयात पाठविण्यात आले असता मृत घोषित करण्यात आले.

बल्लारपूर शहरात गुंड प्रवृत्तीच्या विरोधीगटात सातत्याने  वाढते गँग वॉर चिंतेचा विषय आहे. हे गोळीबार प्रकरण सुद्धा याच गँग वॉर चा भाग असल्याचे चर्चेत आहे. दरम्यान सुरज बहुरिया मृत घोषित झाल्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींनीं बल्लारपूर पोलीस ठाणे येथे आत्मसमर्पण केल्याचे कळताच त्याच्या शेकडो समर्थकांनी पोलीस ठाण्यावर चढून जात आरोपींशी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी लाठीचार्ज करत बहुरिया समर्थकांना पांगविले. या घटनेने बल्लारपूर सहित चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध तस्करांचे धाबे दणाणले असून. परिस्तिथी नियंत्रणात असल्याचे ठाणेदार भगत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here