उखर्डा पाटी ते नागरी मार्गावरील जीव घेणे खड्डे बुजविण्यात यावे :–अभिजित कुडे

0
119

वरोरा :–

उखर्डा पाटी ते उखर्डा तथा उखर्डा ते नागरी मार्गावर जिवघेने खड्डे पडले असून नागरिकांना रोज आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे ,रात्रीच्या वेळेस या मार्गावर अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. करिता राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे यांनी वरोरा विधानसभा आमदार सौ.प्रतिभा ताई धानोरकर यांच्या कडे या समस्येकडे जातीने लक्ष देऊन खड्डे बुजविण्यात यावे असे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी विहीर योजना अंतर्गत शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे अशी विनंती केली .आमदार नी लवकरात लवकर खड्डे बुजविण्यात येणार असे आश्र्वासन दिले .यावेळी रोशन भोयर, वीकेश ताम गाडगे ,सदानंद पानतावणे ,विजय कुडे,प्रमोद कुडे, रंजीत कुडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here