चंद्रपूर जिल्ह्यातील 5 व्या कोरोना बाधिताचा मृत्यू

0
73

 

चंद्रपूर, दि.11 ऑगस्ट:

चंद्रपूर जिल्ह्यातील वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. बल्लारपूर येथील 70 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचे आज कोरोनामुळे सकाळी 11 वाजता वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात निधन झाले. श्वसनाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असणाऱ्या बालाजी वार्ड, बल्लारपूर येथील या नागरिकाला 2 ऑगस्टला दाखल करण्यात आले होते. आल्यापासून त्यांची प्रकृती गंभीर होती. जिल्ह्यातील बाधितांची संख्या 898 वर पोहोचली आहे.आत्तापर्यंत 543 बाधित बरे झाले आहेत. तर 348 बाधितांवर चंद्रपूरमध्ये उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात 26 बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील 5 व्या कोरोना बाधिताचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 898

543 झाले बरे ; 348 वर उपचार सुरू

जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या पैकी हा कोरोनामुळे झालेला पाचवा मृत्यू आहे. आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील पाच वगळता अन्य दोन मृत्यूमध्ये तेलगांना राज्य व बुलडाणा जिल्हयातील प्रत्येकी एकाचा सहभाग आहे.

आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर व लगतच्या परिसरातील 11 पॉझिटिव्हचा समावेश आहे. राजुरा व भद्रावती येथील प्रत्येकी दोन, बल्लारपूर येथील सहा, ब्रह्मपुरी येथील तीन तर मुल व चिमूर येथील प्रत्येकी एका पॉझिटिव्हचा समावेश आहे.

राजुरा गडी वार्ड येथील 57 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह म्हणून पुढे आला आहे. विरूर तालुका राजुरा येथील 54 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह ठरला आहे.

चंद्रपूर येथील 24 वर्षीय युवक पॉझिटिव्ह ठरला आहे. हवेली गार्डन परिसरातील 54 वर्षीय महिला बाधित ठरली आहे. ही महिला नागपूर येथून प्रवास करून परत आलेली होती. नगीना बाग येथील अकोला येथून परत आलेला 22 वर्षीय युवक बाधित आढळला आहे.

जेटपुरा वार्ड हनुमान मंदिर परिसरातील संपर्कातून 37 वर्षीय पुरुष बाधित ठरला आहे. वडगाव गॅलक्सी अपार्टमेंट परिसरातील इतर जिल्ह्यातून प्रवास केल्यामुळे 22 वर्षीय युवती पॉझिटिव्ह ठरली आहे.

बंगाली कॅम्प शांतीनगर चंद्रपूर येथील कोरोना सदृश्य लक्षणे असणारे 60 वर्षीय पुरुष, 51 वर्षीय महिला, 47 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे. तर कोरोना सदृश्य लक्षणे असणारे घुग्घुस वार्ड नंबर 2 येथील 54 वर्षीय महिला बाधित ठरली आहे. सिस्टर कॉलनी येथील 27 वर्षीय युवक बाधित ठरला आहे. पद्मापूर येथील 48 वर्षीय पुरुष बाधित ठरला आहे. सिनाळा तालुका मुल येथील 75 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह ठरला आहे.

विसापूर तालुका बल्लारपूर येथील संपर्कातून 55 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय युवक तर 58 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह ठरले आहेत. गृह अलगीकरणात असलेले गोकुळ नगर वार्ड बल्लारपूर येथील 36 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह ठरला आहे. महाराणा प्रताप वार्ड बल्लारपूर येथील 28 वर्षीय युवक बाधित ठरला आहे. रेल्वे वार्ड बल्लारपूर येथील 34 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह ठरला आहे.

ब्रह्मपुरी मांगली येथील 38 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष तर 6 वर्षाची मुलगी बाधित ठरली आहे.

चिमूर येथील पोलीस कॉर्टर परिसरातील 25 वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह ठरला आहे. भद्रावती येथील एमटीए कॉलनी परिसरातील 37 वर्षीय महिला बाधित ठरली आहे. तर भद्रावती नवीन माजरी शांती कॉलनी परिसरातील 27 वर्षीय युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह ठरला आहे.

000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here