राणभाजी : काटवल जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, सेवन केल्याने होतात ‘हे’ आजार दूर

398

*काटवल*
आपल्या आहारात भाज्यांचा सामावेश असावा असे नेहमीच सांगितले जाते. पालेभाज्या,फळभाज्या इत्यादि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांमुळे आपल्याला योग्य ते पोषक घटक मिळत असतात. आपल्याला प्रत्येकाला आवडणारी एक भाजी असते. प्रत्येक भाजीमध्ये वेगळे पोषणमूल्य असते. प्रत्येक भाजीमध्ये सामावलेले पोषक घटकही वेगवेगळे असतात. काही भाज्या या विशिष्ठ भागांमध्ये, विशिष्ट हंगामात पिकवल्या जातात. आज आपण अशाच एका भाजीबद्दल जाणून घेणार आहोत जिच्यामध्ये भरभरुन पोषणमूल्ये असतात. या भाजीला काही लोक जगातील सगळ्यात जास्त शक्तिदायी भाजी मानतात. अशा या जगातील सर्वात जास्त शक्तीदायी भाजी चे नाव आहे काटवल/ करटोली.  काटवल / करटोली या भाजीपासून शरीराला होणारे फायदे पुढील प्रमाणे आहेत:

1) करटोली या भाजीमध्ये आरोग्यासाठी हितकारक असे अनेक गुणधर्म असतात. करटोली या भाजीचे सेवन केल्यामुळे शरीराचे बलवर्धन होते.

2) करटोली ही भाजी कारल्याप्रमाणे दिसते. करटोली या भाजीचे उत्पादन डोंगराळ भागात घेतले जाते. या भाजीचा वेल असतो व या वेलीवर कारल्याशी साम्य असणारी छोटी फळे निर्माण होतात. या फळापासूनच करटोलीची भाजी बनवली जाते. करटोलीच्या भाजीच्या सेवनामुळे अनेक आजारांना दूर केले जाऊ शकते. या फायद्यांमुळे करटोलीच्या भाजीची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते.

3) करटोलीची भाजी मुख्यत्वे पावसाळ्यात पिकवली जाते.

4) करटोली च्या भाजीमध्ये मांसाहारातून मिळणा-या प्रथिनांच्या बरोबरीने प्रथिने असतात. शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे अँटीआँक्सिडंट सुद्धा करटोली च्या भाजीमध्ये असतात

5) करटोलीच्या भाजीचे सेवन हे मधुमेह, रक्तदाब आणि तणावाने पिडीत असलेल्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर असते.करटोली च्या भाजीमुळे रक्तदाबाचे प्रमाण नियंत्रित राखले जाते.

6) करटोलीच्या भाजीच्या सेवनाने पोटाशी निगडित आजार,अपचन,बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते.

7) करटोलीच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात केटोरोईनेडस असतात. या घटकामचळे डोळ्यांचे आरोग्य नीट राखले जाते.ह्द्याशी निगडीत समस्यांवरसुद्धा करटोलीच्या भाजीमुळे काही अंशी उपाय केला जाऊ शकतो असे आढळून आले आहे.

8) करटोलीच्या भाजीमध्ये एलर्जेन आणि असाल्जेनिक हे घटक असतात.या घटकांमुळे सर्दी ,खोकला या आजारांपासून आराम मिळतो. 

9) करटोलीला गोड कारले असेही संबोधले जाते.करटोली ची भाजी विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र,कोकण,मराठवाडा यांसह गुजरात मध्येही पिकवली जाते.

10) करटोली ही उत्तम विरेचन गुणधर्म असलेली भाजी आहे मुळव्याधीवरही करटोलीची भाजी गुणकारी ठरते.

11) करटोली च्या वेलीवरील पाने ही हाडांच्या दुखण्यावर प्रभावी आहेत.

12) करटोलीची भाजी ही डोकेदुखी वर अतिशय परिणाम कारक उपाय आहे.