रेल्वेंच्या विभागीय ग्राहक सल्लागार समितीवर जयकिरणसिह बजगोती

101

रेल्वेंच्या विभागीय ग्राहक सल्लागार समितीवर जयकिरणसिह बजगोती यांची निवड

बल्लारपूर-अक्षय भोयर(ता.प्र)

बल्लारपूर-भारतीय रेल्वेच्या वतीने ग्राहकांच्या हक्क संरक्षणासाठी विभागीय समितीवर अनेक सदस्यांची निवड करण्यात येते यानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय ग्राहक सल्लागार समितीवर बल्लारपूर चे माजी नगरसेवक जयकिरणसिह बजगोती यांची निवड करण्यात आली आहे

.रेल्वेंच्या विभागीय ग्राहक सल्लागार समितीवर जयकिरणसिह बजगोती यांची निवड

त्यांची निवड 01 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत करण्यात आली असून सदर निवड चंद्रपूर-आर्णी मतदार संघाचे खासदार श्री. बाळूभाऊ धानोरकर यांच्या शिफारशीनुसार मध्य रेल्वे नागपूर चे विभागीय रेल्वेचे सिनियर कमर्शियल मॅनेजर के.एस.पाटील यांनी ही निवड केली असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जयकिरणसिह बजगोती यांनी या निवडी बद्दल खासदार बाळूभाऊ धानोरकर, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. विजयभाऊ वडेट्टीवार, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या रजनीताई हजारे, काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष अब्दुल करीम भाई व नरेश मुंदडा यांचे आभार व्यक्त केले आहे.