धार्मीक सणांच्या पार्श्वभूमीवर तात्पुरते  छोटे दुकाने लावण्यास परवाणगी

0
104

  चंद्रपुर

        ऑगष्ट,, सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिण्यात अनेक धार्मीक सन आहेत. या पार्श्वभूमीवर पात्पूरते स्वरुपातील छोटे दूकाने लावण्याची परवाणगी देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत छोटे दुकाने लावण्याची परवाणगी देण्यात आली असून तसा आदेशही पारित करण्यात आला आहे. त्यामूळे या सणांवर अवलंबून असलेल्या छोटया व्यावसांयीकांना दिलासा मिळाला आहे.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीला यशधार्मीक सणांच्या पार्श्वभूमीवर तात्पुरते  छोटे दुकाने लावण्यास परवाणगी

    चंद्रपूर जिल्हात कोरोना बाधीतांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काटेकोर उपायोजना केल्या जात आहे. मात्र याचा मोठा फटका छोटया व्यवसायांवर बसत आहे. दरम्याण आता प्रशासनाच्या वतीने नियमांमध्ये थोडी शिथीलता देण्यात आली आहे. असे असले तरी काही ठरावीकच प्रतिष्ठाने सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. मात्र ऑगष्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोंबर  महिण्यात महिण्यात अनेक धार्मीक सण आले आहेत. पोळा, गणपती, नवरात्र, दसेरा, दिवाळी  या महत्वाच्या धार्मीक सणांचा समावेश आहे. वर्षातून एकदास येणा-या या सणांकरीता अनेक छोटे व्यापारी कर्ज काढून तात्पूरते छोटे दूकाने सुरु करतात मात्र कारोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनामूळे या दुकानांवर घाला आहे. विषेश म्हणजे यात ग्रामीण भागातील व्यवसायीकांचा मोठया संख्यने समावेश असतो. कारोनामूळे आधीच अर्थव्यवस्था कोळमळली असून नागरिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. आता येण सणांच्या तोडांवर कोरोनाच्या संकटामूळे या छोटया व्यावसायीकांचे मोठे आर्थिक नुकसाण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेता धार्मीक सणांच्या पार्श्वभूमीवर तात्पूरते  छोटे दुकाने सुरु करण्याची परवाणगी देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. या मागणीचा सतत पाठपूरावा त्यांच्या वतीने केला जात होता. आता त्यांच्या पाठपूराव्याला यश आले असून धार्मीक सणांच्या पार्श्वभूमीवर तात्पूरत्या स्वरुपात छोटे दुकाने लावण्यास परवाणगी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here