औद्योगीक शहर घुग्घुस येथे एका राजकीय पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

0
80

घुग्घुस

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना  विषाणूचा संसर्ग अत्यंत वेगाने होत आहे.जिल्ह्यातील औद्योगीक शहर असलेले घुग्घुस येथील श्रीराम वॉर्ड नं. 2 येथे राहणारे एका  राजकीय पार्टीचे जिल्हास्तरीय नेते यांच्या 65 वर्षीय मातोश्री या संक्रमित झाल्या आहे. त्यांच्या कुटुंबातील ऐकून 3 सदस्य हे संक्रमित झाले आहे. या परिसरातील खाजगी डॉक्टर यांचा परिसर आधीच सील करण्यात आला होता.

आज श्रीराम वॉर्डातील एका राजकीय परतीच्या नेत्याचे    घर व परिसर हे सील करण्यात आले यासोबतच सुभाष नगर वसाहतीत ही अलगीकरण करण्यात आले आहे.
एका पक्षीया नेते यांचे मातोश्री व सुभाष नगर येथील ताई व त्यांची मुलगी या दिनांक 5 ऑगस्ट रोजी चंद्रपूर – घुग्घुस मार्गावरील अहमद लाण येथे झालेल्या लग्नाच्या कार्यक्रमात शामिल झाले होते. याठिकाणी घुग्घुस येथील संक्रमित खाजगी डॉक्टर व त्यांच्या कोरोनाग्रस्त पत्नी सह यांचा संपर्क आला होता. या लग्नाच्या  कार्यक्रमात घुग्घुस येथील अनेक प्रभावशाली परिवारातील सन्माननीय नागरिक व राजकारणातले मोठे प्रस्थ उपस्थित होते. त्यांच्या कुटुंबातीलच लोकांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा वावर सातत्याने घुग्घुस येथे होता व प्रचंड गर्दी असलेल्या वाढदिवस कार्यक्रमात ही त्याची लक्षणीय उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here