मारोडा : ग्राम प्रशासकीय भवनाचे व सौर ऊर्जा पाणी पुरवठा योजनेचे 15 ला लोकार्पण

0
94

मुल

     राज्‍याचे माजी अर्थमंत्री तथा बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मंजूर मारोडा या गावातील ग्राम प्रशासकीय भवनाचे तसेच सौर ऊर्जा पाणी पुरवठा योजनाचे लोकार्पण स्‍वातंत्र्यदिनी 15 ऑगस्‍ट रोजी दुपारी 12.30 वा. संपन्‍न होणार आहे.

मारोडा येथे 15 ऑगस्‍ट रोजी ग्राम प्रशासकीय भवनाचे व सौर ऊर्जा पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण

 

सदर ग्राम प्रशासकीय भवनात आ. मुनगंटीवार यांच्‍या माध्‍यमातुन ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन सुध्‍दा उपलब्‍ध करण्‍यात आली असून या मशीनचे लोकार्पण यावेळी करण्‍यात येणार आहे. त्‍याचप्रमाणे या परिसरात वृक्षारोपण सुध्‍दा आ. मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले राहणार असून प्रमुख अतिथी या नात्‍याने मुल पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, उपसभापती घनश्‍याम जुमनाके, पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी कपील कलोडे, मारोडा सरपंच सौ. स्‍वाती पुनकटवार, उपसरपंच सौ. सुलभा नन्‍नावरे, पंकज पुल्‍लावार आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती राहणार आहे. या लोकार्पण सोहळयाला नागरिकांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्‍यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here