घुग्घुस : देशी-विदेशी दारु ,च्या शंभर पेट्या जप्त, दोन अटकेत तर मुख्य सुत्रधार फरार…

0
92

 

घुग्घुस :

बुधवारी रात्री 9 वाजता बेलोरा SST Point वर तैनात पोलीस सचिन डोहे व प्रकाश करमे यांनी वणी तालुक्यातुन येनारी स्काॅर्पीओ क्रमांक एमएच 34 एएम 1450 ला थांबवुन तपासणी केली असता त्यात 100 पेटी देशी-विदेशी दारु आढळुन आली.

100 पेटी देशी-विदेशी दारु जप्त, दोन अटकेत तर मुख्य सुत्रधार फरार…
चंद्रपुर जिल्हात अवैध दारु तस्करीचे अनेक गुन्हे दाखल असलेल्या वणीचे जैयस्वाल नामक दारु तस्कराचा मुद्देमाल असल्याची चर्चा

दारू तस्करीत होन्डा सिटी, डस्टर, टाटा इंडीका, काळ्या पिवळ्या व लाल रंगाच्या स्विफ्ट गाड्यांचा वापर“

आरोपी राजु शंकर आत्राम 22 रा वणी व शंकर श्रीराम कोवे 19 रा वणी यांना अटक केली तर दोन आरोपी फरार आहे.
विदेशी दारु किंमत 1 लाख रुपए देशी दारु किंमत 4 लाख रुपए व वाहन किंमत 9 लाख रुपए असा एकुण 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारु तस्करीचा मुख्य सुत्रधार फरार कसा झाला ? असा हि प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. मुख्य सुत्रधार फरार होण्यात यशस्वी झाल आणी फक्त चालकास अटक केली गेली आहे हे संशयस्पद रित्या वाटत आहे. वणी तालुक्यातील शिरपुर पोलीस स्टेशन हद्दीतील नायगांव चेकपोस्ट येथे वर्धा नदीच्या पुलाजवळच पोलीस चौकी आहे तिथे पोलीस तैनात असतात परंतु हि चौकी पार करुन स्काॅर्पीओ गाड़ी पुल ओलांडुन घुग्घुस हद्दीत आली त्यामुळे शिरपुर पोलीसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here