शाहकोल ट्रान्सपोर्ट कंपणीच्या कोळसा डेपोत अपघातात ट्रक चालक सुनिल चौधरी मृत

0
87
  • चंद्रपूर : बुधवारला रात्री धानोरा फाट्या जवळील रस्त्यालगत शाहकोल ट्रान्सपोर्ट कंपणीच्या कोळसा डेपोत ट्रक चालक सुनिल चौधरी 40 रा. सालोरी तालुका वरोरा याचा ट्रक क्रमांक एम एच 34 एबी 6703 च्या आतील कॅबिन मध्ये अचानक मॄत्यु झाला.

आज गुरुवार ला सकाळी सहा वाजता चालक कामावर गेले असता हि बाब उघडकिस आली त्यामुळे संतप्त ट्रक चालकांनी काम बंद केले आणी कंपनीच्या व्यवस्थापनाला व मॄतकाच्या कुटुंबीयांना माहिती दिली. ट्रक चालकांनी काम बंद केल्याने व मॄतकाच्या कुटुंबीयांनी 25 लाख रुपए ची व सहा महिण्याचा पगार देण्याची मागणी केली त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घुग्घूसचे शाहा.पो.नि. गोरक्षनाथ नागलोत गुन्हे शाखेचे सचिन बोरकर, विनोद वानकर, सुधीर मत्ते, दिलीप वांढरे हे घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी चंद्रपुर येथे पाठविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here