गोंडपिपरी : नगर पंचायतच्या माजी नगराध्यक्षसह अन्य तिन नगर सेवक अपात्र घोषित

0
114

 

गोंडपिपरी -:

येथील नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष व अन्य तीन नगर सेवकांनी निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने अपात्र तेची कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली

गोंडपिपरी नगर पंचायतच्या माजी नगराध्यक्षसह अन्य तिन नगर सेवक अपात्र घोषित*

विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र न जोडल्याने कारवाई

यात अपात्र ठरविण्यात आले ले माजी नगराध्यक्ष संजय झाडे, नगर सेवक जितेंद्र इटेकर, किरण नगारे, सरिता पुणेकर यांचा समावेश असल्याचे कळते. या संदर्भात वृत्ताची पुष्टी करण्यासाठी नगर पंचायत चे अधीक्षक बिसे यांचेशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. उपरोक्त कारवाई चंद्रपूर जिल्हाधिकरी यांचे कडून पार पडली असून तब्बल एक वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असतांना सदर अपात्रतेची कारवाई करतांना तब्बल साडे चार वर्षाचा काळ लोटल्याने कारवाईत मोठी दिरंगाई करण्यात आल्याचे सोशल मीडिया वर टीका टिप्पणी केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here