1400 कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबियांना आर्सेनिक अलबमचे कवच

0
110
चंद्रपुर
     कोरोना युद्धात डॉक्टर व पोलिसांच्या पाठोपाठ डाक विभागही युद्धपातळीवर आपली भूमिका चोख बजावत आहे.या विषयाची विशेष दखल घेत आ सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १४७४ कर्मचाऱ्यानां (योद्ध्यांना )आयुष मंत्रालय द्वारा प्रमाणित आर्सेनिक अलबम ३० हे होमियोपॅथीचे औषध उपलब्ध करून दिले असून नुकतेच त्याचे वितरण महानगर भाजपा च्या वतीने आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्य  आयोजित सेवा सप्ताह अंतर्गत कार्यक्रमात मंगळवार ११ ऑगस्टला करण्यात आले.*
*आ मुनगंटीवारांनी घेतली डाक विभागाची दखल*
*१४०० कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबियांना आर्सेनिक अलबमचे कवच*
*यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवर डाक अधीक्षक ए एन सुशिर,सह.अधीक्षक आशिष बनसोड,प्रवर डाकपाल अनिल भासारकर,सह.पोस्टमास्टर ताराना खोब्रागडे,भाजपा जिल्हाध्यक्ष (शहर)डॉ मंगेश गुलवाडे,महापौर राखी कांचरलावार,उपमहापौर राहुल पावडे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष(शहर) विशाल निंबाळकर,भाजपा नेते प्रकाश धारणे,नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, प्रशांत विघ्नेश्वर, मीनाक्षी वाळके यांची मंचावर उपस्थिती होती.*
*या प्रसंगी प्रवर अधीक्षक ए एन सुशिर यांना चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील ६५ उप डाकघर अंतर्गत येणाऱ्या ६००  कार्यालयातील १४७४ कर्मचाऱ्याच्या परिवारासाठी आर्सेनिक अलबम चे पार्सल डॉ मंगेश गुलवाडे यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आले.*
*या प्रसंगी बोलतांना  डॉ गुलवाडे म्हणाले,कोरोना पूर्णपणे जाणार नसून मीच माझा रक्षक म्हणून काळजी घ्यावी.तर यावेळी बोलताना महापौर राखी कांचारलावार यांनी पोस्ट विभागाच्या कार्याचे कौतुक करीत संपूर्ण पोस्ट कार्यालय निर्जंतुकीकरण करून देण्याचे आश्वासन दिले.यावेळी ए एन सुशिर,भासारकर यांनी समयोचित मार्गदर्शन केले.प्रास्ताविकात तराना खोब्रागडे यांनी कोरोनाच्या संकटात पोस्ट विभागाची भूमिका विशद केली.कार्यक्रमाचे संचालन प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले तर सुभाष कासंगोट्टूवार यांनी आभार मानले.कार्यक्रमाला डाक विभागातील कर्मचाऱ्यासह अमीन शेख,रामकुमार अकापेलिवार यांची उपस्थिती होती.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here