खाजगी कोंचिंग क्लासेसचा मार्ग मोकळा .?

0
83

चंद्रपूर:
कोरोनाच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जग आणि भारत देशात हाहाकार माजला असतांना, त्याचा परिणाम विविध क्षेत्रात झाला असून, खाजगी कोंचिंग क्लासेस त्याला अपवाद नाही. मार्च महिन्यापासून खाजगी कोंचिंग क्लासेस बंद असून, कोंचिंग संचालकांना आर्थिक समस्याना तोंड द्यावे लागत असून, त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.आतापर्यंत शासनाला खाजगी कोंचिंग क्लासेस संचालकने सहकार्य केले आहे,परंतु कोरणामुळे त्यांचा व्यवसाय मागील 5 महिन्यापासून बंद असल्याने , भाडे किराया , विद्युत देयक , प्रपंच चालविणे फार कठीण झाल्याने, यासंबंधी शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपूर कोंचिंग क्लासेस असोसिएशनचे अध्यक्ष निमेश मानकर यांनी बहुजन कल्याण , तथा आपत्ती व्यवस्थापण मंत्री,पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा मा.ना.विजयभाऊ वडडेट्टीवर , तथा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना सातत्याने खाजगी शिकवणीवर्ग सुरू करण्याबाबत ( वर्ग९,१०, १२वी) निवेदन दिलेली होती. परंतु याबाबत निर्णय वरच्या स्तरावर मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री घेईल असे सांगण्यात येत होते.यासंबंधी शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपूर कोंचिंग क्लासेस असोसिएशनचे अध्यक्ष निमेश मानकर यांनी मा.ना. उपमुख्यमंत्री, तथा अर्थ व नियोजन मंत्री श्री अजितदादा पवार यांच्याशी इमेलच्या माध्यमातून निवेदन पाठविली तसेच फोनद्वारे सातत्याने याबाबत पाठपुरवठा केला. जिल्हा स्तरावरून कुठलाच निर्णय होत नसल्यानं, कोंचिंग क्लासेस संचालक नाउमेद झाले होते. निमेश मानकर यांनी मा.ना. उपमुख्यमंत्री अजितदादाशी फोनद्वारे संपर्क केला (दिनांक 11 ऑगस्ट रोजी)असता, दादा मीटिंग मध्ये व्यस्त होते, दादांच्या कार्यलयिन कर्मचारीने फोन उचलला असतां, मी खाजगी कोंचिंग क्लासेसच्या समस्या बाबत सांगितले(या अगोदर सुद्धा email/ फोनद्वारे) त्यांनी माझे नाव विचारले आणि दादांना निरोप देतो म्हणून सांगितले, (दादाने मला नावाने ओळखले)दादाने लगेच मीटिंग आटपून , स्वतः मला फोन केल्यानं आश्चर्यचा सुखद धक्का बसला, मी सविस्तर विषय दादांना सांगितला, दादाने लगेच सांगितले तेथील ,मा. पालकमंत्री,जिल्हा प्रशासन ,कलेक्टर पोलीस अधीक्षकांना स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्याचा अधिकार आहे असे सांगितले. तसेच मी (अजितदादा पवारांनी) सांगितले असून मा. पालकमंत्री यांची भेट घ्यावी अशी सूचना दिली. जेणेकरून काल दिनांक 14 ऑगस्ट रोजी नियोजन भवन , चंद्रपूर इथे मा. पालकमंत्री साहेब आलं असतांना, खाजगी कोंचिंग क्लासेस असोसिएशनचे पदाधिकारी, निमेश मानकर, शशीकांत देशकर, संजय तुरीले भेटलं असता दादांची सूचना सांगितली. आज 15 ऑगस्ट रोजी बहुजन कल्याण तथा आपत्ती व्यवस्थापण मंत्री,मा.ना.विजयभाऊ वडडेट्टीवर यांनी आज चंद्रपूर इथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना सरकार कोंचिंग क्लासेसला परवानगी देण्याबाबत सकारात्मक आहे असं सांगितले. मा.अजितदादाने फोनद्वारे सूचना केल्यानं हा विषय लवकरच मार्गी लागेल यात शंका नाही असे कोंचिंग क्लासेस अध्यक्ष निमेश मानकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here