शासनाची फसवणूक ,नागरिकांची दिशाभूल केलेल्या कंत्राटदाराला पालिकेनी काळ्या यादीत समाविष्ठ करा

138

दिपक खेकारे
:गडचांदूर:
पंधरा दिवस लोटूनही कारवाई नाही
गडचांदूर शहरातील कचरा व्यवस्थापन सार्वजनिक जागा,शासकीय कार्यालय,शौचालय यांची निगा न राखता शहराला स्वच्छ सुंदर शहरांचा दर्जा प्राप्ती मुकविणार्‍या “युवक कल्याण सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित” या संस्थेने शासनाची फसवणूक करीत नागरिकांची दिशाभूल केली असून अश्या संस्थेला कंत्राटदाराला पालिकेनी काळ्या यादीत समाविष्ठ करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भीम आर्मीचे उपजिल्हा प्रमुख मदन बोरकर यांनी निवेदनातून पंधरा दिवसापासून प्रशासनाकडे मागणी केली आहे. परंतु कंत्राटदारावर एजेयूएनएएचआय शासनाने कुठलीही कारवाई केली नसून कोरोंनाच्य्या महामारीत माला आंदोलन करण्यास भाग पडू नये असे मत भीम आर्मीचे उपजिल्हा प्रमुख मदन बोरकर यांनी न्यूज महाराष्ट्राची टिम ला बोलताना सांगितले.

करारनाम्यानुसार मुद्दा क्रमांक (७) मध्ये नगर परिषद ने वरील संस्थेला 11 घंटागाड्या व शासनाच्या निधीतून उपलब्ध होणाऱ्या १८ हात गाड्या व ६ स्वयंचलित टाटा एस इत्यादीचा पुरवठा नगरपरिषद गडचांदूर करून दिला परंतु कंत्राटदाराने हात गाड्या वरचे संपूर्ण मजुरांना निकामी करून फक्त गावात ६ टाटा एस गाड्या चालविल्या व त्यात एकूण फक्त २३ मजूर काम करतात करारनाम्यानुसार झालेला संपूर्ण तीन वर्षाचा कंत्राट मनुष्यबळावर दिलेला होता परंतु संपूर्ण करारनाम्याची पायमल्ली करून संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने गैर प्रकाराने काम सुरू आहे असेही त्यांनी निवेदनाटुन्न म्हटले आहे .

ओला सुका कचरा एकत्रीत संकलन

कंत्राटदाराकडून शहरात ओला व सुका कचरा एकत्रित संकलीत केला जातो काही तर काही वेळा वेगळा सुद्धा करण्यात येतो परंतु कचरा डम्पिंग करतांना तो विलगिकर करण्यात येत नाही त्या मुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून अनेकांचे स्वास्थ धोक्यात घालनाचे काम कंत्राटदरकडून करण्यात येत आहे.

सफाई कर्मचाऱ्यांच्या पगारात दुरव्यवहार अनेकांची EPF भरणा नाही

शहरात संस्थेकडे असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पगारात तफावत असून त्यांच्यासोबत दुरव्यवहार केल्या जात असल्याची खळबळजनक घटनांही या माध्यमातून समोर आली असून शासकीय नियमानुसार सफाई कामगारांना वेतनवाढ मिळायला हवी होती त्यांची इ-पीएफ भरणा करायला हवी होती परंतु असे झाले नाही.सदर कंत्राटदार २२० रु. प्रति दिवसा प्रमाणे सर्व मजुरांना ७५०० प्रती माह वेतन देत आहे.त्यातही अनेक कामगारांचे इ पी एफ भरणा केलेली नाही.

घनकचऱ्यातून खताची निर्मिती नाही.

घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ व राष्ट्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळांनी वेळोवेळी निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असताना सदर कंत्राटदाराने घनकचरा विलगीकरणात व कंपोस्टींग न करता एकत्रित टाकल्याने तेथील परिसरात मोठ्याप्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. अश्या अनेक कारणाने पालिकेला नामांकन पुरस्कारापासून मुकावे लागले आहे.

गडचांदूर नगरपरिषदेत मोठ्याप्रमाणात घोळ सुरू असल्याचे मजकुर बोरकर यांनी निवेदनात नमूद केले असून यासर्व बाबींना जबाबदार असलेल्या नगरपरिषदेच्या शासकिय अधिकार्‍या‍ंवर आणि कंत्राटदारावर तत्काळ कारवाई करून संस्थेला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी शासनांनाकडे केली होती