“लाॅकडाऊन” कथासंग्रह चे ऐतिहासिक डिजिटल प्रकाशन

0
123

नागपूर
मायमराठी नक्षत्र नागपूर समुहाच्या वतीने आयोजित *आचार्य विजया मारोतकर* लिखित लाॅकडाऊन कथासंग्रह डिजीटल प्रकाशन सोहळा 15 आॅगस्ट 2020 ला दुपारी 1 वाजता आॅनलाईन आयोजित करण्यात आला.
खरंच… कानाला मधुर वाटावा.. अनं डोळ्यांना सारखा पाहतच राहावा असा ऐतिहासिक दिमाखदार प्रकाशन सोहळ्याचा अनुभव याची देही याच डोळी आस्वादीत करता आला याचा एक रसिक म्हणून खरंच मनापासून अभिमान वाटतो आहे…
तुझ्या नावातच विजय आहे आणि.. तु साऱ्यांची ताई अनं मी अनाथांची माई.. वाह.. वा.. क्या बात है… असे आपण एकच आहे…” अशी कौतुकाच्या शब्दांजलीत लाॅकडाऊन कथासंग्रह च्या लेखिकेचे कौतुक करणाऱ्या.. संपूर्ण विश्वाला परिचित असणाऱ्या अनाथांची माय असणाऱ्या *मा सिंधुताई सपकाळ* यांच्या शुभहस्ते या दिमाखदार लाॅकडाऊन कथासंग्रहाचे विमोचन करण्यात आले.
कोरोना विश्वमहामारीच्या सहवासात वावरत असतांनाही लाॅकडाऊन चा जिवघेणा प्रसंग नजरेत असतांनाही त्याच आठवणींना शब्दबद्ध करणे खरंच हे अव्दितिय असेच आहे.. असे भावोदगार याप्रसंगी या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष *मा डॉ गोविंद नांदेडे*(माजी शिक्षण सचिव महाराष्ट्र राज्य) यांनी काढले.
“आपल्या सभोवार लाॅकडाऊन चा विचित्र अनुभव घर करत असतांना एक लेखिका.. एक आई.. स्वस्थ बसूच शकत नाही.. आणि अशातच लाॅकडाऊन कथासंग्रहाचा जन्म झाला त्या वेदनांना घेऊन समजून वाताहात होत असणाऱ्या एका सामान्यांची हळहळ काळजाला अस्वस्थ जेव्हा जेव्हा करुन टाकते तेव्हा तेव्हा लाॅकडाऊन अनुभवांचा सार उदयास येतो… “असे मर्मोदगार या प्रसंगी प्रकाशनपीठाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणाऱ्या सुप्रसिद्ध साहित्यिका नागपूर मा डॉ अरुंधती वैद्य यांनी काढले.

याप्रसंगी *मा डॉ अशोक पाटील* (सुप्रसिद्ध साहित्यिक इस्लामपूर सांगली) आणि मा *संजय नाथे* (संचालक नाथे पब्लिकेशन्स नागपूर) आवर्जून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रत्येक माणूस आपापल्या परीने वेगवेगळ्या कल्पना करतो आणि त्या कल्पनांनी आपल्या अनुभवाचे रंग भरतो आणि काहीतरी साकारुन आणतो असे मार्मिकपणे भावोदगार याप्रसंगी मा संजय नाथे सरांनी यावेळी उपस्थितींना केले.

लाॅकडाऊन कथासंग्रह चे यावेळी मान्यवरांच्या आॅनलाईन उपस्थितीत डिजीटल प्रकाशन करण्यात आले. डिजीटल प्रकाशन हा दिमाखदार सोहळा अनुभवण्याचा मायमराठी नक्षत्र नागपूर समूह चा पहिलाच प्रयत्न होता अनं तोही ऐतिहासिक यशाची शिखर कोरुनच सुगंधित दरवळला.

“माणुस म्हणुन जगतांना.. माणसाचं मनं आपल्या सभोवार घडणाऱ्या गोष्टींचा मागोवा घेत असते.. देशात लाॅकडाऊन परिस्थिती असतांना आईच्या काळजाला सुद्धा या लाॅकडाऊन ने भयभीत केले होते.. रोज पाहणाऱ्या बातम्यातून त्यात चिंतेची भर अधिकच होत होती.. अनं मनं हेलकावे खात होते.. मनाला अनं आईच्या काळजाला सावरतांना लेखणीचा आधार मिळाला अनं.. लाॅकडाऊन चा वेदनांचा.. भावभावनांचा ठेवा प्रासादिक देऊन गेला… ” असे भावमर्म याप्रसंगी लाॅकडाऊन कथासंग्रह च्या लेखिका आचार्य विजया मारोतकर मॅडम यांनी यावेळी उपस्थितींना केले. हे ऐकतांना रसिकांच्याही काळजात अलगद ओलाव्याचे प्रसाद टिपून गेले होते.

या प्रकाशन सोहळ्याच्या प्रत्येक क्षणा क्षणाला लेखिका विजया मारोतकर यांच्यावर महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.. ज्यात लेखिकेसह मायमराठी नक्षत्र नागपूर समूह चा प्रत्येक शिलेदार अगदी चिंब चिंब भिजून गेला. प्रकाशनाचा व्हिडीओ लोकार्पीत होताच टाळ्यांच्या कडकडाटात तो सुवर्ण क्षण नजरेस भरुन आला जणू हा देखणा सोहळा एखाद्या प्रशस्त सभागृहातच संपन्न होत आहे…

या सोहळ्यास मायमराठी नक्षत्र नागपूर समूह चे सचिव मा प्रभाकर तांडेकर आवर्जून उपस्थित होते व त्यांनी याप्रसंगी विजया मारोतकर एक चिंतन हा मारोतकर मॅडम यांच्या साहित्यिक वाटचालीस अजरामर करणारा लेख लोकार्पीत केला या सोहळ्याचे सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य ला परिचित असणारे ज्येष्ठ नाटककार मा मंगेश बावसे(कार्याध्यक्ष मायमराठी नक्षत्र नागपूर समूह) यांनी आपल्या नाट्यमय शैलीच्या मोहकतेत केले ज्यांनी रसिक अगदी मोहवून गेले.. प्रत्येक शब्द नं शब्द जणू चांदण्यांचे गोड शिंपले आहे की काय असा अनुभव रोमरोमी संचारत होता. तर आभाराचा सुगंध मायमराठी नक्षत्र नागपूर समुहाच्या सहकार्याध्यक्षा मा. निता खोत यांनी अगदी ऋणात्मक केला… मायमराठी नक्षत्र नागपूर समुहाच्या या ऐतिहासिक सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी समस्त कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले आणि हा अभूतपूर्व सोहळाचा सुगंध चोहोदिशा दरवळून आणला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here