नागरी : तपोवन आदिवासी ग्रामीण विकास संस्थाचे वतीने गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार

118

वरोरा
तालुक्यातील नूतन नेहरू विद्यालय आणी कनिष्ठ महाविद्यालय नागरी येथील विशेष प्राविन्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. तपोवन आदिवासी ग्रामीण विकास संस्था द्वारा या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात सातत्याने परिश्रम घेऊन आपले लक्ष गाठलं त्यांना नेत्रदीपक पुरस्कार 2020देऊन मान्यवरांचे हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप होते. अंकिता राजू बगाटे वर्ग 10वा ह्या विद्यार्थीनिने 93%गुण प्राप्त करून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकवला. तिला सेवानीवृत्त शिक्षक संजय तेलंग यांचे कडून 3000रुपये रोख बक्षीस देण्यात आले. आणी निखिल बंडू पारसे वर्ग 12, अश्विनी सुनील डोंगरे वर्ग 12वा ह्या दोन विद्यार्थीनी महाविद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने त्यांना प्रत्येकी 1000रुपये रोख बक्षीस सामाजिक कार्यकर्ते डॉ. मनोज तेलंग यांच्याकडून देण्यात आले. यावेळी नूतन नेहरू विद्यालय नागरी चे अध्यक्ष दिलीप टिपले, प्राचार्य बावने सर, पत्रकार श्याम बलखंडे, नामदेव घुबडे,शिक्षक आणी कर्मचारी उपस्थित होते.