लॉयड मेटलच्या कारखान्यातील सुमारे ४३४ कामगारांचा विविध मागण्या मान्य

0
99

चंद्रपूर :
लॉयड मेटलच्या व्यवस्थापनाकडून कोरोनाच्या लॉकडाऊनपासून कामगारविरोधी धोरण राबविले जात असल्याने कामगारवर्गात असंतोष फोफावला आहे. कामगारांनी कारखान्याच्या गेट समोर आंदोलन सुरु केले. कामगारांचे विविध प्रश्न सोडविण्याकरिता खासदार बाळू धानोरकर पुढाकार घेत कामगारांना महिन्याला २१ दिवस काम देण्याची प्रमुख मागणी मान्य केली. यामुळे ४५ तासाचे आंदोलन संपल्यामुळे कामगारांत आनंद दिसून येत आहे.

कोरोनाच्या लोकडाऊनच्या काळात कामगारांना पुरेशे वेतन दिले नाही. मागील महिन्यापासून कारखान्याचे उत्पन्न पूर्ववत सुरु झाले असताना कामगारांना केवळ १५ दिवसांचे काम देण्यात येत होते. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आहे आहे. असा अनेक मागण्यासाठी आज चंद्रपूर शासकीय विश्राम गृह येथे कारखान्याचे अधिकारी प्रशांत पुरी, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर, लॉयड मेटल कामगार अध्यक्ष दिनेशजी चोखारे, चंद्रपूर शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष रामू तिवारी, लॉयड मेटल कामगार कार्याध्यक्ष रोशन पचारे, लॉयड मेटल कामगार कार्याध्यक्ष पवन अगदारी, सोहेल शेख यांची उपस्थिती होती. या बैठकीत कामगारांचे अनेक मागण्या कारखाना व्यवस्थापना पुढे ठेवण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने कामगारांना महिन्याला २१ दिवस काम देण्याची प्रमुख मागणी मान्य झाली. ह्या मागण्या पूर्ण करत येत्या काही दिवसात अन्य मागण्या देखील पूर्ण करण्यात येईल असे कारखान्याचे व्यवस्थापक प्रशांत पुरी यांनी सांगितले. यावर कामगारांनी देखील समाधान मनत आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here