रामनगर पोलिसांनी पकडली लाखोंची दारू, दोन आरोपी अटकेत

0
111

चंद्रपूर –
चंद्रपूर जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात अवैध दारू तस्करीचा व्यापार जोमात सुरू आहे, काही तस्कर पोलिसांना गवसतात पण काही निसटून जातात.
अवैध दारू तस्करीत आता रेती तस्करी करणारे सुद्धा आपलं नशीब आजमावत आहे.
असाच एक रेती तस्कर दारू तस्करीच्या धंद्यात मागील काही वर्षांपासून नशीब आजमावत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने घुग्गुस, गोंडपीपरी व बल्लारपूर शहर हे 5 दिवसांसाठी पूर्णपणे बंद केले आहे यातच घुग्गुस शहरातील नवीन कुमार सिंग व सुशील कुमार राबठ या दोघांना रामनगर पोलिसांनी दारू साठ्यासाह अटक केली आहे.
16 ऑगस्टला रात्री शहरातील शकुंतला लॉन चंद्रपूर येथे रामनगर पोलिसांच्या नाकेबंदी दरम्यान एक्सयूव्ही गाडी क्रमांक एम एच 46 पी 4679 ची झडती घेतली असता त्या गाडीत खरड्याच्या खोक्यात 6 हजार 400 नग 90 मिली देशी दारूच्या निपा किंमत 6 लाख 40 हजार, चारचाकी वाहन किंमत 10 लाख, 3 मोबाईल संच किंमत 30 हजार एकूण 16 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक झालेल्या आरोपीमध्ये घुग्गुस येथील नवीन कुमार सिंग व सुशील राबठ यांचे दारू अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष दरेकर, माहुलीकर, आनंद परचाके, शंकर येरमे, रामभाऊ राठोड, निलेश मुडे, माजिद खा पठाण यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here