घुग्घुस : पहिल्या दिवशीच संचारबंदीचे उल्लंघन तर दुकाने व प्रतिष्ठाने बंदच

0
82

घुग्घुस :
आज सोमवारी सकाळी बाहादे ले-आउट येथील राहनारा एक व्यक्ती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना प्रा.आ. केंद्रात तपासणी करीता गेले असता तो कोरोना बाधीत आढळला सुत्रानुसार मिळालेल्या माहिती नुसार तो लाॅयड्स मेटल कंपनीतील कामगार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे घुग्घुस येथे कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २० झाली आहे.

सर्व प्रथम २५ मे ला लाॅयड्स काॅलनीत कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आल्याने खळबऴ उडाली होती

आज सकाळ पासुनच घुग्घुस येथे संचारबंदीचा फज्जा उडाला आहे. नागरिकांचे येने जाने सुरुच आहे दुचाकी वाहने व चार चाकी वाहने रस्त्यावर धावत आहे. घुग्घुस येथे १९ कोरोना बाधीत रुग्ण आढळले.
रविवारला सायंकाळी ६ वाजता दरम्यान पासुन लाॅकडाऊन घोषित करण्यात आले होते. परंतु प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाने पहिल्या दिवशीच संचारबंदीचा फज्जा उडाला. बारा तास लोटुन सुद्धा घुग्घुस बसस्थानक चौकात पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला नाही. तसेच घुग्घुस शहराची सिमा सिल करण्यात आलेली नाही.
त्यामुळे घुग्घुस येथे कोरोना संक्रमणाची भिती वाढली आहे. घुग्घुस येथील इंदिरानगर येथे २, रामनगर येथे ४, सुभाषनगर येथे ४, शालिकराम नगर येथे ३, अमराई वार्ड येथे १,श्रीराम वार्ड येथे ५, केमीकल नगर येथे १ व नकोडा येथे ५ यात एसीसी काॅलनीतील एका महिलेचा कोरोना मुळे मॄत्यु झाला आणी लाॅयड्स काॅलनी येथे १ कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आल्याने घुग्घुस येथे लाॅकडाऊन घोषित करण्यात आले.
घुग्घुस ग्रामपंचायत क्षेत्रात दिनांक १६ अगस्त रोजीचे सायंकाळी ६ वाजता पासुन ते दिनांक २० अगस्त रोजीचे रात्री ११:५९ वाजता पर्यंत लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे.
१४ अगस्त को रोजी तहसील कार्यालय चंद्रपुर प्रप्त प्रस्तावानुसार घुग्घुस ग्रामपंचायत क्षेत्रात व लगतच्या क्षेत्रात २४ व्यक्ती कोरोना बाधीत झाले असल्याचे निदर्शनास आले आहे.

हे कोरोना बाधीत इतर नागरिकांच्या संपर्कात आले असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने रुग्णांचा संपर्कात आलेल्या नागरीकांचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक आहे. घुग्घुस ग्रामपंचायत क्षेत्रात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन घोषित करण्यात येत आहे.

घुग्घुस ग्रामपंचायत क्षेत्रात नागरिकांचे अवागमनसह खालील अस्थापना संपुर्णता बंद करण्यात येत आहे. सर्व किराणा दुकाने किरकोळ दुकाने व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करनारे व्यापारी,दुकानें,अस्थापना संपुर्णता बंद राहतील. सर्व प्रकारचे केश कर्तनालय, सलुन, ब्युटी पार्लर बंद राहतील, उपहार ग्रॄह, लाॅज, हाॅटेल बंद राहतील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, शिकवनी वर्ग बंद राहतील. मास, मासे, चिकन, अंडी विक्री बंद राहतील.
सार्वजनिक व खाजगी प्रवासी दोन चाकी, तिन चाकी व चार चाकी वाहने संपुर्णता बंद राहतील.
पेट्रोल पंप व गॅस पंप सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत सुरु राहतील. मेडीकल दुकानें सकाळी ९ ते ७ वाजेपर्यंत सुरु राहतील.

शिवभोजन थाळी सुरु राहतील. असे आव्हान कोवीड १९ समीती घुग्घुस ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतिने करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here