शेतकऱ्यांचे दैवत : बैल पोळा विशेष

0
86
  1.           आपला देश कृषी प्राधान  देश आहे आणि कृषीसाठी गुरांचे देखील आपले वेगळे महत्त्व आहे. भारतात गुरांची देखील पूजा केली जाते आणि पोळा सण त्यापैकी एक आहे ज्या दिवशी गाय, बैलाची पूजा केली जाते. या दिवशी शेतकरी आणि इतर लोकं देखील गुरांची विशेष करुन बैलाची पूजा करतात, त्यांना सजवतात आणि पोळाला बैल पोळा असे देखील म्हटलं जातं.

पोळा अमावस्येच्या दिवशी येत असून याला पिठोरी अमावस्या म्हणून देखील साजरा करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केल जातो. बैल पोळाला मोठा पोळा आणि दुसर्‍या दिवशी तान्हा पोळा म्हणून साजरा होता.

जेव्हा प्रभू विष्णू कृष्णाच्या रुपात धरतीवर आले तो दिवस जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो आणि तेव्हापासून कृष्णाचा मामा कंस त्याचे प्राण घेऊ बघत असताना कंसाने अनेकदा कृष्णाचा वध करण्यासाठी असुर पाठवले. एकदा कंसाने पोलासुर नावाचा राक्षस पाठवला होता तेव्हा कृष्णाने त्याचा वध करुन सर्वांना हैराण केले होते तो दिवस अमावस्येचा होता. म्हणून या दिवसाला पोळा असे म्हणू लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here