शास्त्रीनगर प्रभागात भाजपा चे जनसंपर्क कार्यालय

0
117
चंद्रपूर
           नगरसेवक या शब्दातच त्यांचे कर्तव्य स्पष्‍ट आहे.त्यामुळे नागरिक मोठ्या अपेक्षा घेऊन त्यांचेकडे येतात. प्रत्येक समस्या सुटतेच असे नाही, पण त्या नागरिकांना व्यक्त होण्यास एक माध्यम व दालन हवे असते,भाजपाचे हे जनसंपर्क कार्यालय  एक दालन आहे, असे प्रतिपादन महापौर सौ. राखी कंचर्लावार यांनी केले. ते शास्त्रीनगर प्रभाग क्र०२ येथील नगरसेवक सोपान वायकर यांच्या ‘जनसंपर्क कार्यालय’ उद्घाटनप्रसंगी सोमवार (१७ऑगस्ट) ला उद्घाटक म्हणून बोलत होत्या.
जनसंपर्क कार्यालय एक दालन – राखी कंचर्लावार
शास्त्रीनगर प्रभागात भाजपा चे जनसंपर्क कार्यालय
भाजपा जिल्हाध्यक्ष (शहर) डॉ.गुलवाडे यांची उपस्थिती.
यावेळी अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष (नगर) डॉ मंगेश गुलवाडे,भाजपा नेते प्रकाश धारणे,जी प सदस्य ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष (शहर) विशाल निंबाळकर सभापती शीतल गुरनुले, प्रशांत विघ्नेश्वर,विठ्ठल डुकरे,भाजपा मंडळ अध्यक्ष प्रमोद शास्त्रकार,रवी गुरनुले,मधुकर अडपवार,प्रमोद काळे,दिवाकर कनकुलवार,रामकुमार कापेलिवार यांची उपस्थिती होती.
सौ. कंचर्लावार म्हणाल्या,महानगरपालिका प्रशासन नेहमीच जनहितार्थ कार्य करत आले आहे.या पुढेही जनसेवा हेच ध्येय राहणार आहे.नगरसेवकांनी जनतेचे प्रश्न ऐकून घ्यावे,ते सोडविण्याचे प्रयत्न आपण करू,असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी डॉ गुलवाडे म्हणाले,आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार प्रत्येक नगरसेवकांना जनसंपर्क कार्यालय सुरू करून सेवकाच्या भूमिकेत राहून कार्य करायचे आहे.तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला समजून घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक सोपं वायकर यांनी केले, तर विठ्ठल डुकरे यांनी आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here