शहर लॉकडाऊन असतांना ही बल्लारपूरात भरला पोळा

0
106

 

बल्लारपूर- अक्षय भोयर (ता,प्र)

कोरोनाच्या सतत वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे व बल्लारपूर शहरात कोरोनाबाधित 3 रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे मा. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार व मा.उपविभागीय अधिकारी बल्लारपूर यांच्या आदेशानुसार बल्लारपूर शहरात 17 ऑगस्ट 2020 ते 22 ऑगस्ट 2020 पर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे.

प्रतिबंधात्मक आदेश असतांना शहर लॉकडाऊन असतांना ही बल्लारपूरात भरला पोळा : शासनाच्या आदेशाची पायमल्ली

यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येवर नियंत्रण येईल व सतत वाढणाऱ्या कोरोनवर नियंत्रण आणता येईल असा प्रशासनाचा उद्देश होता मात्र याच आदेशाची पायमल्ली बल्लारपूरकर करतात की काय असा प्रश्न निर्माण होत आहे प्रशासनाने पोळा या सणासह येणाऱ्या काळात येणारे सर्व सण उत्सव घरी व मर्यादित प्रमाणात साजरे करण्याचे आवाहन केल्यानंतरही बल्लारपूर शहरात आज सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास पोळा भरल्याचे दिसून आले आहे अनेक शेतकरी बांधव आपल्या बैल जोडी घेऊन बल्लारपूर शहरातील वस्ती विभागातील महात्मा गांधी पुतळा परिसरात जमा झाल्याचे दिसून आले यावरून असा प्रश्न निर्माण होतो की शासनाचे आदेश केवळ कागदोपत्री स्वरूपात मर्यादित आहेत का?
प्रशासनाच्या आदेशानुसार लॉकडाउन दरम्यान संपूर्णतः बंद करण्याचे आवाहन केल्यानंतरही बल्लारपूर शहरातील अनेक आस्थापने नाममात्र बंद असल्याचे चित्र दिसत आहे शिवाय प्रशासनाच्या आदेशानंतरही बल्लारपूर शहरात पोळा भरल्याचे चित्र दिसून आले यामुळे खरच बल्लारपूरकर प्रशासनाच्या आदेशाचे कितपत पालन करतात यावरही प्रश्न निर्माण होत आहे.
शासन प्रशासन नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने निर्णय घेतात मात्र जनता या निर्णयाची अंमलबजावणी करतांना दिसत नाही त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या लॉकडाउन मध्ये शिथिलता आणून नागरिकांना मोकळीक द्यावी अशी मागणीही बल्लारपूर शहरातील राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यानी केली आहे याकडे स्थानिक शासन प्रशासन किती लक्ष देते हे पाहणे औचित्याचे ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here