IAF ने तैनात केली पाकिस्तान सीमेवर ‘तेजस’ फायटर विमाने

144

 

पाकिस्तानला लागून असणाऱ्या सीमेवर IAF ने तैनात केली ‘तेजस’ फायटर विमाने
लडाख सीमेवर चीन बरोबर तणाव सुरु असताना इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानला लागून असलेल्या पश्चिम सीमेवर ‘तेजस’ फायटर विमाने तैनात केली आहेत. ‘तेजस’ हे स्वदेशी बनावटीचे हलके फायटर विमान आहे. “पाकिस्तानने कुठलीही आगळीक केल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानला लागून असलेल्या पश्चिम सीमेवर तेजसची तैनाती केली आहे” सरकारी सूत्रांनी एएनआयला ही माहिती दिली.
लडाखमध्ये चीन आक्रमकता दाखवत असताना भारताने चीन आणि पाकिस्तान दोन्ही सीमांवर आपली फायटर विमाने तैनात केली आहेत. दिवसा आणि रात्री कुठल्याही क्षणी भारताची फायटर विमाने शत्रुला उत्तर देण्यास सक्षम आहेत
फ्लाइंग ड्रॅगनच्या नावाने ओळखले जाणारे तेजसचे पहिले स्क्वाड्रन एअर फोर्सच्या तामिळनाडूतील सुलूर येथील बेसवर तैनात आहे. १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजसचे कौतुक केले होते.
तेजस एलसीए मार्क १ ए ची खरेदी प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. मे महिन्यात तामिळनाडूतल्या सुलूर बेसवर इंडियन एअर फोर्सची ‘फ्लाईंग बुलेट्स’ ही १८ नंबरची स्क्वाड्रन कार्यान्वित झाली आहे.
IAF मधील ‘तेजस’ची ही दुसरी स्क्वाड्रन आहे. यावर्षाच्या अखेरपर्यंत इंडियन एअर फोर्स आणि संरक्षण मंत्रालय तेजस मार्क १ ए ची ८३ विमाने खरेदी करण्याची डील पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे. लडाखमध्ये चीन आक्रमकता दाखवत असताना भारताने चीन आणि पाकिस्तान दोन्ही सीमांवर आपली फायटर विमाने तैनात केली आहेत. दिवसा आणि रात्री कुठल्याही क्षणी भारताची फायटर विमाने शत्रुला उत्तर देण्यास सक्षम आहेत. एअर फोर्सकडून तसा सरावही सुरु आहे.