चंद्रपूर : जिल्ह्यात आज 30 बाधित

0
101

चंद्रपूर : जिल्ह्यात आतापर्यंत 816 कोरोना बाधित उपचाराअंती बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 1195 झाली आहे. गेल्या 24 तासात 30 बाधित पुढे आलेले आहेत. सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 368 झाली आहे.
आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 13 बाधितांचा समावेश आहे. यामध्ये एसीडब्ल्यू कॉलनी परिसरातील, बोरकर नगर परिसरातील, भानग्राम वार्ड, मल्हारी बाबा सोसायटी परिसरातील, बालाजी वार्ड नंबर 2, चव्हाण कॉलनी परिसरातील, पंचशील चौक, बाबुपेठ परिसरातील बाधित पुढे आले आहेत.
राजुरा येथील दोन बाधीत ठरले आहेत. कोरपना तालुक्यातील व चिमूर तालुक्यातील प्रत्येकी दोन बाधित पुढे आलेले आहेत. भद्रावती येथील शास्त्रीनगर व राहुल नगर परिसरातील प्रत्येकी एक बाधीत पुढे आलेले आहेत.
बल्लारपूर येथील एका बाधिताचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ब्रह्मपुरी विद्या नगर येथील एक तर तालुक्यातील वायगाव येथील दोन बाधित ठरले आहेत. नागभीड येथील एक तर तालुक्यातील कन्नाळ गाव येथील तीन व चिखलगाव येथील एक असे एकूण पाच बाधित पुढे आलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here