बल्लारपूर : पोलीस ठान्यात सुद्धा कोरोनाचा प्रवेश

0
114

 

बल्लारपूर -अक्षय भोयर (ता,प्र)

बल्लारपूर ;-

जवळपास 25 मार्च 2020 पासून देशभरात टाळेबंदी जाहीर करण्यात आली व त्यानंतर च्या काळात बल्लारपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखत सोबत या ४ ते ५ महिन्याच्या काळात कोरोनाशी लढा देत नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्याच्या सूचना देत होते, मात्र आज कोरोना संक्रमण काळाच्या 4 महिन्यानंतर बल्लारपूर पोलीस ठान्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती समोर येत आहे.

या बाबत सूत्रांच्या माहिती नुसार बल्लारपूर पोलीस ठान्यात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक यांचा सह 3 पोलीस कर्मचारी कोरोना बाधित असल्याची माहिती समोर आली सदर पोलीस अधिकारी व कर्मचारी हे संपर्कातुन बाधित झाले असण्याची शक्यता आहे. सदर बाब बल्लारपूर शहरात माहिती होताच बल्लारपूर पोलीस ठान्या तील अनेक पोलीस कर्मचारी बांधवांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
बल्लारपूर शहरात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे मा.जिल्हाधिकारी यांच्या सूचने नुसार व मा.उपविभागीय अधिकारी बल्लारपूर यांच्या आदेशानुसार बल्लारपूर-बामणी परिसरात 17 ते 22 ऑगस्ट 2020 पर्यंत टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे या टाळेबंदी मागे कोरोना संक्रमनाची साखडी तोडण्याचा उद्देश होता,

मात्र आता बल्लारपूरात 4 पोलीस बांधवच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे बल्लारपूर पोलीस ठान्यात धावपड निर्माण झाली आहे व बल्लारपूर पोलीस ठान्यात पॉझिटिव्ह सापडलेल्या 4 पोलीस कर्मचाऱ्याना आयसोलेट केले असुन त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here