बल्लारपुर : नगर परिषद द्वारा मोठ्या प्रमाणात स्वच्छतेच्या उपाय योजना

0
93

 

बल्लारपूर-अक्षय भोयर (ता,प्र)

नगर परिषद बल्लारपुर द्वारा वर्षा ऋतुला समोर जाता मोठ्या प्रमाणात स्वच्छतेच्या उपाय योजनेला सुरुवात करत ड्रेनेज सफाई,ओपन नाली व ड्रेनेजचे निरजंतुकीकरण करणे. सार्वजनिक स्थळांवरील कचरा सफाई इत्यादी बांबीवर विशेष मोहिमेद्वारा स्वच्छता व निरजंतुकरन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.जेने करुन पावसाळ्याच्या कालावधीत संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये.या अगोदरच पावसाळा सुरु होण्यापुर्वी मोठ्या नाल्यांची सफाई करण्यात आलेली होती.

नगर परिषद बल्लारपुर द्वारा वर्षा ऋतुला समोर जाता मोठ्या प्रमाणात स्वच्छतेच्या उपाय योजनेला सुरुवात.

विकासपुरूष मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या तर्फे शहरातील 20 सार्वजनिक ठिकानी अॅटोमॅटीक सॅनिटायझर मशिन उपलब्ध होणार.

बल्लारपुर शहरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव बघता नगर पालिके कडुन झाकीर हुसैन वार्डातील बल्लारपुर मेडीकल असोसिएशन हाॅल व वस्ती विभागात नगर परिषदेच्या आरोग्य केंद्रावर मोठ्या प्रमानात अॅन्टीजेन चाचनी द्वारा कोरोना निदान करण्यात येत आहे.नागरिकांमध्ये सर्दी,ताप, खोकला सारखे लक्षणे आढळल्यास वरील स्थळांवर जावुन आपली तपासनी अवश्य करुन घ्यावी असे नगर प्रशासनाने तर्फे विनंती करण्यात आली आहे.

तसेच विकासपुरूष मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या तर्फे बल्लारपुर शहरात कोरोना सदृष्य परिस्थितीत कोरोना विषाणुशी लढा देण्यासाठी नागरिकांकरिता 20 सार्वजनिक ठिकानी अॅटोमॅटीक सॅनिटायझर मशिन उपलब्ध करुण देण्यात येत आहे.अशी माहीती नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here