एकेरी ट्रक मालकांचे, रोजगारांच्या मुद्द्यावर अर्धा डजन ट्रक असोसिएशन, संघटना रस्त्यावर

0
67

 

चंद्रपुर :

एकेरी ट्रक मालकांचे रोजगारांच्या मुद्द्यावर अर्धा डजन ट्रक असोसिएशन युनियन मैदानात उतरल्या आहे.  घुग्घुस ग्रामपंचायत आर्थीकदॄष्ट्या संपन्न आहे. या औद्योगिक शहरात वेकोलीच्या कोळसा खाणी, एसीसी सिमेंट कंपनी, लाॅयड्स मेटल कंपनीचा स्टील प्लांट आहे. परंतु पाच वर्षापुर्वी घुग्घुस शहरा लगत गुप्ता कोल वाशरीज, भाटीया कोल वाशरीज, इंडोयुनिक कोल वाशरीज सुरु होत्या. तेव्हा एकेरी ट्रक चालक मालकांच्या ट्रकांना काम मिळत असल्याने त्यांची आर्थीक परिस्थीती चांगली होती. परंतु कालांतराने ह्या कोल वाशरीज बंद पडल्या.

घुग्घुस चंद्रपुर मार्गावरील सेंट्रल एम आय डी सी येथे विविध कंपन्यात रोजगार होता. त्यामुळे घुग्घुस शहरातील अनेक बेरोजगार युवकांनी ज्याचे वडिल वेकोलीच्या विविध कोळसा खाणी चे कामगार असलेले ते सेवानिवृत्त होताच त्यांनी ट्रक खरेदी करुन विविध कंपन्यात व वेकोलीच्या कोळसा खाणीत कोळसा वाहतुक करुन आपल्या परिवाराची उपजिवीका केली. परंतु चंद्रपुर व शहरातील मोठ्या ट्रक ट्रान्सपोर्ट कंपणीच्या मालकांचे ३०० पेक्षा अधिक ट्रक आहे.

स्थानिक ट्रक चालक मालकांचे २०० ट्रकांद्वारे डिओ धारकांकडुन परमिट घेऊन काम करावे लागत असे. परंतु मागील पाच वर्षात अनेक राजकिय पक्षाच्या नेत्यांनी या डिओ व्यवसायात आपले नशीब आजमावले विना वाहन धारक असतांना ही नेत्यांचे वारे-न्यारे झाले. दुसरी कड़े मोठ्या ट्रान्सपोर्टरांनी शहरातील कंपनीतील डिओ घेऊन आपल्याच ट्रकांद्वारे कोळसा वाहतुक सुरु केली. त्यामुळे स्थानिक एकेरी ट्रक चालक मालकांवर उपासमारीची वेळ आली.

सांगीतल्या जात आहे कि ट्रक चालत नसल्याने व काम मिळत नसल्याने फायनांन्स कंपनीचे हफ्ते भरणे कठिण झाले आहे. इकडे डिजल च्या वाढत्या किंमतीने व कोळसा वाहतुकीचे भाड़े कमी मिळत असल्याने या एकेरी ट्रक चालक मालकांच्या परिवाराचे भरण-पोषण करने कठिन झाले आहे.

मोठ्या ट्रान्सपोर्टरांच्या मनमानी कारभारांना पाहता तिन वर्षापुर्वी स्थानिक एकेरी ट्रक मालकांनी एकत्रीत येऊन सर्वात आधी श्रमीक एल्गार संघटनेची ट्रान्सपोर्ट युनियन स्थापन केली होती. त्यानंतर काॅग्रेस, भाजपा, शिवसेना, जनशक्ती, राष्ट्रीय जनरल मजदुर युनियन च्या नावाने घुग्घुस येथे तब्बल ६ युनियन बनविण्यात आल्या व घुग्घुस शहरातील मुख्य चौकात, व अनेक ठिकानी आपल्या राजकिय समर्थक नेत्यांचे व पदाधिका-यांचे मोठमोठे होर्डींग व बॅनर लावुन चर्चेत राहण्याची होड लागली आहे.

विशेष बाब म्हणजे एका युनियन मध्ये कोणी युनियनचे सदस्य बनुन कार्यरत आहे तर कोणी अध्यक्ष बनत आहे हे समझण्या पलिकडेच आहे. घुग्घुस शहरा लगत कोळसा खाणी त्याच आहे पैनगंगा, निलजई २, निलजई साऊथ परंतु ट्रक चालक मालकांच्या अर्धा डजन युनियन बनल्या आहेत.

येणाऱ्या काळात या वाहतूक संघटना एकल (सिंगल) मोटार मालकांचा विकासा करिता कंपन्या सोबत किती झुंज देऊन त्यांचा कितपत विकास करतात हे येणारा काळच सांगेल ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here