बल्लारपूर : गोलपुलाखालील रस्ताचे काम निकृष्ट !

103

 

बल्लारपूर- अक्षय भोयर(ता,प्र)

बल्लारपूर शहर हे दोन भागात विभागले आहे,  वस्ती विभाग व टेकडी विभाग  शहरातील नागरिकांना एका भागातून दुसऱ्या भागात जायचे असल्यास गोल पूला खालून जावे लागते ,गोलपुलिया खाली अनेक गड्डे पडल्यामुळे वाहन धारकांना आपले वाहन गड्ड्यातून चालवावे लागत होते , शिवाय या ठिकाणी लहान मोठे अपघात सुद्धा या आधी झाले आहे , दोन महिन्या अगोदर या गड्ड्यामुळे एका व्यक्तीचा जीव गेला , या रस्तच्या बातम्या सर्व वृत्तवाहिन्यांनी व वृत्तपत्रात प्रसिद् झाल्या वर  नगर  पालिकेला जाग आली व पालिकेने या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली ,

नगर पालिकेने कुठल्या निकषावर या जीवघेणी गड्ड्यांवर गट्टू लावण्याचा विचार केला ?  पुला खाली असलेल्या पाईपलाईन मुळे संपूर्ण रस्त्यावर पाणी जमा असते खरच ह्या पाण्यामुळे गट्टू लावणे योग्य आहे का ?

नगरपालिकेने जनतेच्या पैशाचे असे दुरउपयोग करणे योग्य आहे का ?
असा  प्रश्न नागरिकांना पडला आहे