कोरोना बाधित अधिकाऱ्यांच्या संपर्कातील अभियंत्याचे मोकाट भ्रमण …

0
114

 

गोंडपिपरी :- तालुका प्रतिनिधी

स्थानिक पंचायत समिती चे प्रमुख अधिकारी यांच्या नागपूर रिटर्न दौऱ्या नंतर तब्बेतीत बिघाड होताच तपासणी अंती ते कोरोना पॉझिटिव्ह निघाले.

गोंडपिपरी पं.स. तील प्रकार :- प्रशासनाने दखल घेण्याची गरज

याच दरम्यान त्यांच्या अती निकट वावरणार्या एका ग्रामसेवकां चा अहवालही पॉझिटिव्ह आला होता. तत्पूर्वी त्या कोरोना बाधित प्रमुख अधिकाऱ्यांच्या संपर्कात पंचायत समितीतील अनेक सहाय्यक अधिकारी कर्मचारी संपर्कात आले असून यांचेही तपासणी साठी स्व्याब नमुने घेण्यात आले होते. यात एंटीजन टेस्ट नुसार अनेकांचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र ऑंटीजन तपासणी प्रणालीवर अवलंबून न राहता पॉझिटिव्ह आलेल्या संपर्कातील व्यक्तींना पूर्व काळजी म्हणून 14 दिवसाचे गृह विलगीकरण करून कोरोना या महामारी संकटा चा पुढील धोका टाळता आला असता. मात्र प्रशासनाने असे न केल्यामुळे आज बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची मोकाट भ्रमण सुरू असून त्याच्या प्रकृती तही काही लक्षणे आहेत. अशा परिस्थितीत यांचे कार्यालयात ये-जा करणे व सर्वसामान्यांची संपर्क यामुळे तालुक्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून नागरिकांमध्ये याबाबत उलट सुलट चर्चा व प्रशासनाच्या अजब कारभारावर नाना तरेची प्रश्न विचारला जात आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी येथील प. स.चे प्रमुख अधिकारी यांनी एका कार्यक्रमासाठी नागपूर येथे जाऊन उपस्थिती दर्शवित कार्यक्रम पार पाडला. याच दरम्यान त्यांचा कोरोना बाधित रुग्णांशी संपर्क होऊन ते गोंडपिप्री ते दाखल होताच एक-दोन दिवसांमध्ये त्यांच्या तब्येतीत बिघाड होऊन त्यांना सुद्धा कोरोना रोगाची लक्षणे जाणवू लागली. यानंतर त्यांची आरोग्य तपासणी केली असता त्यांचा को रोना अहवाल पॉझिटिव्ह आला. आणि प्रशासनाची भंबेरी उडाली. कारण पंचायत समितीतील प्रमुख अधिकारी कोरूना बाधित आढळल्याने त्यांचेशी दैनदिन कामाकरिता भेट घाट करणारे व संपर्कात येणारे हे बहुसंख्य असतात. लगेच प्रशासनाने पाऊल उचलत त्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व ग्रामसेवक सर्वसामान्य व्यक्ती व पंचायत समितीतील इतर कर्मचारी यांची नावे नोंदवून या सर्वांची आरोग्य तपासणी व नमुने घेण्यात आले. घेण्यात आलेल्या नमुन्यांची एंटीजन टेस्टद्वारे तपासणी केली असता अनेकांचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी मात्र केवळ एंटीजन टेस्ट वर अवलंबून राहता बाधित अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना 14 दिवसांचे गृह विलगीकरण का करण्यात आले नाही असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे. तर याच दरम्यान सदर को रोना बाधित अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या बांधकाम विभागाच्या एका शाखा अभियंता त्या ची प्रकृतीत बिघाड झाला असून त्या अभियंत्याच्या प्रकृती बिघाडी’ची लक्षणेही कोरोना बाधित रुग्णांत प्रमाणे असून त्या अभियंत्याचे मोकाट भ्रमण हे संपूर्ण परिसर शहर व तालुका वासियां च्या आरोग्याला धोका संबोधण्याची दाट शक्यता वर्तविली जात असून संबंधित अभियंत्यां ला 14 दिवसाचे विलगीकरण का देण्यात आले नाही असा सवालही सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. त्या अभियंत्याची जरी एंटीजन टेस्ट केली असेल तरी मात्र विलगीकरण ठेवले असते तर परिसरात धोका पसरण्याची मुळीच चिंता निर्माण झाली नसती. प्रशासनाने आताह या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तात्काळ पंचायत समिती बांधकाम विभागातील त्या अभियंत्याला 14 दिवसाचे गृह विलगीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here