चंद्रपूर : जिल्हाधिकारी यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची बाधा

94

चंद्रपूर :

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने जिल्हाधिकारी कार्यालय 2 दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कार्यालय निर्जंतुकीकरण आणि स्वच्छतेसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सुरक्षारक्षक कोरोनाग्रस्त झाल्याने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचाही स्वॅब घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरक्षा रक्षकाच्या संपर्कात आलेल्या सगळ्य़ांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.