वृत्तपत्र विक्रेत्यांना मदत मिळाली नाही तर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मातोश्री वरती करणार आंदोलन

0
107

*वृत्तपत्र विक्रेत्यांना जर लवकर मदत मिळाली नाही तर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मातोश्री वरती करणार आंदोलन*

बृहन्मुंबई

वृत्तपत्र विक्रेता संघ हा मुंबई इ ठाणे नवी मुंबई या सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन किंवा संलग्न करून बनवलेली संघटना आहे. या संघटनेचे अध्यक्ष माननीय मंत्री सुभाष देसाई आहेत. आणि मुंबईतील सर्वांना परिचित असे मुख्य वितरक दांगट एजन्सी चे अध्यक्ष मा.श्री बाजीराव दांगट साहेब हे फोरम या तथाकथित सर्व वृत्तपत्रांच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत. आणि हे बाजीराव दांगट साहेब सर्व कंपन्यांची प्रतिनिधित्व करत जणू काही वृत्तपत्र विक्रेते आपल्या खिशातच आहेत अशा प्रकारचे समज सर्व कंपन्यांना देऊन त्यांच्याकडून जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल यावर ती नेहमी लक्ष ठेवून असतात.

आताच्या Corona परिस्थितीमध्ये 23 मार्च पासून वितरण बंद होते. त्यावेळी लगेच वितरण चालू व्हावे यासाठी सर्व कंपन्या व त्यांचे प्रतिनिधी यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकारी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. शेवटी संघटनेचे अध्यक्ष माननीय मंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात मीटिंग लागली आणि त्या मीटिंगमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सुरक्षेसाठी मास्क, ग्लोज जे काय लागेल ते देण्याची कंपनीने मान्य केले होते. शिवाय वृत्तपत्र विक्रेत्यांना इन्शुरन्स आणि मेडीक्लेम या Corona काळात तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येईल हेही मान्य केले होते.

सामनाचे मुख्य संपादक श्री संजय राऊत यांनी तर वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सुरक्षेबाबत एक संपादक म्हणून लेख लिहिला होता आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. नंतर याच संजय राऊत यांनी स्वतःच्या ऑफिसमध्ये संघटनांच्या त्यांना हव्या त्या प्रतिनिधींना घेऊन आणि फोरमचे अध्यक्ष श्री. बाजीराव दांगट साहेब यांना घेऊन एक मिटिंग आयोजित केली होती. आणि त्या मीटिंगमध्ये फोरमचे अध्यक्ष माननीय श्री बाजीराव दांगट साहेब यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना कोरोना ने मरण पावल्यास तीन लाख रुपये व कोरोना होऊन ॲडमिट झाल्यास पंधरा हजार रुपये तातडीची मदत देण्याचे सर्व कंपन्यांतर्फे फोरमचे अध्यक्ष म्हणून श्री बाजीराव दांगट साहेब यांनी कबूल केले होते. याच मुंबईमध्ये 12 वृत्तपत्र विक्रेते मयत झाले आहेत व पंचवीस ते तीस वृत्तपत्र विक्रेत्यांना कोरोना ची लागण झाली होती. पण आजपर्यंत एकाही वृत्तपत्र विक्रेत्याला ही मदत या फोरम कडून/कंपन्याकडून मिळालेली नाही. वृत्तपत्र विक्रेत्यांना सुरक्षेसाठी मास्क, ग्लोज, श्यानिटायझर दिले गेले नाहीत. आणि मा.श्री बाजीराव दांगट साहेब श्री संजय राऊत साहेब व मंत्री श्री सुभाष देसाई साहेब यांच्याकडून संघटनेच्या प्रतिनिधी वरती प्रचंड दबाव आणला जात आहे त्यामुळेच संघटनेकडून 12 वृत्तपत्र विक्रेते मयत होऊन 25-30 एवढ्या जणांना कोरोनाची लागण होऊन सुद्धा कंपन्याकडून आजपर्यंत एकही रुपयाची मदत दिली गेलेली नाही.

संघटनेच्या मिटिंग ठरल्याप्रमाणे संघटनेच्या लेटरपॅडवर त्या मृत विक्रेत्यांची यादी व ज्यांना कारोणा झाला होता अशा विक्रेत्यांची यादी फोरमला देण्यात यावी यावर चर्चा होऊन सुद्धा आतापर्यंत कोणत्याही प्रकारची यादी संघटनेकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे आपण समजू शकता कि संघटनेच्या प्रतिनिधी वरती या वरिष्ठ मंडळीकडून मोठ्या प्रमाणात दबाव आणला जात आहे फोरमचे अध्यक्ष माननीय श्री बाजीराव दांगट साहेब संघटनेच्या प्रतिनिधी वर प्रचंड दबाव आणत आहेत. खरच मुंबईतील वृत्तपत्र विक्रेत्यांना कोणीही वाली नाही का? याच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या 2018 ला झालेल्या दादर येथील अधिवेशनात माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना आपल सरकार आल्यावर नक्कीच विक्रेत्यांची दखल घेतली जाईल आणि त्यांना सोयी सुविधा पुरविण्यात येतील असे ठाम सांगितले होते. परंतु संजय राऊत साहेब असतील, अध्यक्ष सुभाष देसाई साहेब असतील सर्वांनी या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या संघटनेचा फक्त वापर केलेला आहे असे मला वाटते. जर एखादी संघटना वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी फोरम ने ठरलेले इन्शुरन्स चे तीन लाख रुपये मेडिक्लेम चे 15 हजार रुपये त्याची मागणीही करायला सुद्धा आडकाठी केली जात आहे. म्हणून लवकरच महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटने तर्फे बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाला सोबत घेऊन व मृत विक्रेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना घेऊन फोरम चे अध्यक्ष बाजीराव दांगट यांच्या ऑफिस समोर व श्री संजय राऊत यांच्या ऑफिससमोर आंदोलन करण्यात येईल.

एवढे करूनही जर विक्रेत्यांना ठरवून दिल्याप्रमाणे जर इन्शुरन्स चे 300000 आणि 15000 च्या मेडिक्लेम चे पैसे मिळाले नाहीत तर सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेब यांचे निवासस्थान मातोश्रीवर सुद्धा सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कोकण विभागीय प्रतिनिधी श्री दत्ता घाडगे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here