पोंभुर्णा येथील श्रध्‍दा व भक्‍तीचा सुगंध पोहचला राजधानी मुंबईत

0
93
चंद्रपूर
     राज्‍याचे माजी अर्थ व वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर जिल्‍हयातील पोंभुर्णा येथे आयटीसी या नामवंत कंपनीच्‍या मंगलदीप अगरबत्‍ती ब्रॅन्‍डचे उत्‍पादन घेण्‍यात येत आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा येथील अगरबत्‍ती प्रकल्‍पातील अगरबत्‍ती  श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण
     या प्रकल्‍पातुन निर्माण होणारी अगरबत्‍ती खरेदी करण्‍याची जबाबदारी आयटीसी कंपनीने घ्‍यावी यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्‍यांचयाशी चर्चा केली होती. त्‍या माध्‍यमातुन ही जबाबदारी आयटीसी कंपनीने स्विकारली असून आता पोंभुर्णा येथून निर्माण होणारा हा भक्‍तीचा सुगंध मुंबईतील श्री सिध्‍दीविनायक मंदिरापर्यंत पोहचला आहे. श्री गणेश चतुर्थीचे शुभऔचित्‍य साधुन ‘Mangaldeep Temple – Lord Ganesha’s favourite fragrances Agarbatti’ या नावाने ही अगरबत्‍ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण करण्‍यात आली आहे.
सुप्रसिध्‍द क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेते सोनू सूद यांच्‍या उपस्थितीत ही अगरबत्‍ती सिध्‍दीविनायकाला अर्पण करण्‍यात आली आहे. आ. सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री असताना त्‍यांनी पाचही अर्थसंकल्‍प विधानसभेत सादर करण्‍याआधी श्री सिध्‍दीविनायकाचे दर्शन घेवूनच सादर केले आहेत. श्री सिध्‍दीविनायकावरची त्‍यांची श्रध्‍दा या अगरबत्‍तीच्‍या माध्‍यमातुन बाप्‍पाच्‍या चरणी अर्पण होत आहे. पोंभुर्णा येथील अगरबत्‍ती प्रकल्‍पातून उत्‍पादीत होणारी अगरबत्‍ती देशासह जगभर जावी हे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे स्‍वप्‍न होते. ही अगरबत्‍ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी प्रथमतः अर्पण होत असल्‍याने आ. मुनगंटीवार यांची स्‍वप्‍नपूर्ती होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here