चंद्रपुर : जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी आणखी आरोपी अटकेत

0
81

चंद्रपूर –

जिल्ह्यातील अग्रणी सहकारी बँक म्हणजे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक मागील महिन्यापासून बँकेतील घोटाळा हा चर्चेचा विषय असून यामध्ये 10 ऑगस्टला फिर्यादी रवींद्र शिंदे यांनी रामनगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की माई फर्म च्या नावाने बँकेला दर्जेदार वस्तूचा पुरवठा न करता निकृष्ठ वस्तू व वार्षिक देखभालीच्या नावावर तब्बल 7 कोटी 30 लाख 77 हजारांची बँकेची फसवणूक करण्यात आली.

या फर्मचे प्रोप्ररायटर विनोद गिरी, सचिन साळवे व बँकेचे अध्यक्ष यांनी संगनमत करून ही फसवणूक केल्याची तक्रार शिंदे यांनी दिली आहे.

अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशन रामनगर येथे अप.क. ७६७/२०२० कलम ४२०,४०९,३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला.

सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक चंद्रपुर डॉ श्री. महेश्वर रेडड़ी यांचे मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्र के मकेश्वर हे करीत असुन सदर गुन्हयात सखोल तपासासाठी सिडीसिसि बँकेकडून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अफरातफर करण्यात आलेले दस्तऐवज प्राप्त करण्यात केले त्यावरून आरोपी नामे १) मनोहर लक्ष्मणराव पाउनकर वय ५५ वर्ष, २) सचिन मनोहरराव साळवे वय ३२ रा. लक्ष्मीनगर वार्ड चंद्रपुर, ३) विनोद रतन गिरी वय ५१ याना अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीना मा. न्यायालयापुढे हजर करण्यात आले असुन आरोपीचा पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला आहे. पुढिल तपास आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपुर करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here