भाजपाने सादर केला महानगर “विकास कामांचा लेखाजोखा”*

98
चंद्रपूर
       येथील भारतीय जनता पार्टी,महानगर तर्फे महानगरातील विविध प्रतिष्ठानांच्या संचालकांना सोमवार(२४ ऑगस्ट)ला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या पत्रासह सिंहावलोकन,सैनिकी शाळा हे पुस्तक,आर्सेनिक अलबम ३० औषध व आयुर्वेदिक काढाचे  महितीपत्रक वितरित करण्यात आले.
महानगर भाजपाने सादर केला “विकास कामांचा लेखाजोखा”
आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या यशोगाथेसह पंतप्रधानांचे पत्र वितरित.
या सोबतच या संचालकांना आ सुधीरभाऊ मुनगंटीवार व भाजपा जिल्हाध्यक्ष (शहर) डॉ मंगेश गुलवाडे यांचे शुभेच्छा पत्र देण्यात  येऊन “विकास कामांचा लेखा जोखा” या अभियानाला सुरवात करण्यात आली.*
*यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष (महानगर)डॉ मंगेश गुलवाडे,महापौर राखी कांचर्लावार,भाजपा नेते प्रकाश धारणे,नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार,जि प सदस्य ब्रिजभूषण पाझारे,मनोज सिंघवी,प्रशांत विघ्नेश्वर,प्रज्वलंत कडू,सूरज पेदूलवार,रामकुमार अकापेलिवार,अमीन भाई,चावरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.*
*राज्यात भाजपा-शिवसेना-रिपाई (आ) महायुतीचे शासन असतांना,तत्कालिन अर्थ,नियोजन व वनमंत्री तसेच विद्यमान आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून भगीरथ प्रयत्नाने जिल्ह्यात हजारो कोट्यवधींची शेकडो विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण झाली.त्याची माहिती ‘सिंहावलोकन व सैनिकी शाळा या पुस्तकात प्रकाशित करण्यात आली आहे.यात प्रामुख्याने सैनिकी शाळा,बांबू प्रशिक्षण केंद्र,वन अकादमी,बॉटनिकल गार्डन,उदबत्ती उद्योग,कुक्कुट पालन उदयोग ,बटरफ्लाय गार्डन,डायमंड कटिंग प्रशिक्षण केंद्र ,जागतिक दर्जाचे क्रीडांगण,राष्ट्रपती ए.पी.जे.कलाम गार्डन याचा यात समावेश आहे.हे सर्व प्रकल्प आज पर्यटन केंद्र झाले असतांना कोरोना(कोविड१९)च्या संकटात हे प्रकल्प प्रत्यक्ष मोबाईलवर  बघता यावे म्हणून प्रत्येक प्रकल्पाचा क्यू-आर कोड पुस्तकात देण्यात आला आहे.या कोड द्वारे सर्व प्रकल्पाची भव्यता व सुंदरता वाचकाला अनुभवता येणार आहे.या विकास कामांची माहिती जनते पर्यंत जावी म्हणून महानगर भाजपा तर्फे “विकास कामांचा लेखाजोखा” हे अभियान राबविण्यात येत आहे.अभियानाचा शुभारंभ महापौर राखी कांचर्लावार व भाजपा जिल्हाध्यक्ष(महानगर) डॉ मंगेश गुलवाडे यांचे हस्ते संपूर्ण साहित्य अँकर इलेक्ट्रिकल,भगवती प्रिंटर्स,पु ना गाडगीळ ज्वेलर्स यांना सुपूर्द करून करण्यात आला.महानगरातील किमान १००० प्रतिष्ठानाला हे संपूर्ण साहित्य उपलब्ध करुन दिले जाणार असल्याने ग्राहकांना फावल्या वेळात त्या दुकानातच “डिजिटल पर्यटन”करायला मिळणार आहे.प्रातिनिधिक स्वरूपात बेंगलोर बेकरी,भारत डेकोर, डॉ माडूरवार,डॉ दुधलवार,मुस्तफा डेकोर आणि लक्ष्मी डिजिटल येथे भाजपा नेते प्रकाश धारणे,ब्रिजभूष पाझारे यांचे हस्तेही साहित्य वाटप करण्यात आले.युवानेते प्रज्वलन्त कडू व सूरज पेदूलवार यांच्या नेतृत्वात जटपुरा गेट ते गिरनार चौक,गिरनार चौक ते गांधी चौक,गांधी चौक ते जटपुरा गेट या प्रमाणे किमान १७५ व्यवसायिक प्रतिष्ठानांना सर्व साहित्याची जणू एक किट तयार करून वाटप करण्यात आली.या साठी प्रवीण उरकुडे,सलमान पठाण,अभिजित वांढरे,श्रीकांत येलपुलवार,विवेक शेंडे,पंकज निमजे यांनी धुरा सांभाळली.महानगरातील अन्य मार्गावरील किमान १०००प्रतिष्ठानची निवड यासाठी करण्यात आली असल्याची माहिती यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष(महानगर)डॉ मंगेश गुलवाडे यांनी उपस्थितांना दिली.*
*असा आमदार मिळणे कठीणच–मनोहर टहलियानी*
*आमदार सुधीर मुनगंटीवार यांना ४० वर्षा पासून ओळखतो.त्यांची कामांप्रति निष्ठा अदभुत आहे.सूक्ष्म नियोजन त्यांचे कडून शिकले पाहिजे.त्यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांना एकदाच ५ वर्ष मंत्रीपद मिळाले.या संधीचं त्यांनी सोनं केलं,म्हणून चांदा ते बांदा विकास गंगा प्रवाहित झाली.जो विकास त्यांच्या या कालखंडात झाला.तसा यापूर्वी कोणी केला नाही.असा आमदार मिळणे कठीणच,अशी प्रतिक्रिया लक्ष्मी डिजिटल चे संचालक मनोहर टहलीयानी यांनी नोंदविली.*