डॉ. सुनिल टेकाम यांना शहीदचा दर्जा दया – आदिवासी विकास परिषद

104

 

*चंद्रपूर :

जगभरात कोरोना महामारी चे वातावरण असतांना त्याचा प्रादुर्भाव झपाटयाने महाराष्ट्रात सुद्धा पसरत आहे. व त्यात अनेकांचे बळी जात आहे

कोरोना योद्धा डॉ. सुनिल टेकाम यांना शहीदचा दर्जा दया – आदिवासी विकास परिषद ची मागणी : आ. मुनगंटीवार यांना निवेदन*

*शहीद टेकाम यांच्या पत्नीला नियमित शासकीय सेवेत समाविष्ट करण्यास राजेश टोपे आरोग्य मंत्री यांचे आ. मुनगंटीवार यांना सकारत्मक आश्वासन*

यातच कोरोना रूग्णांच्या सेवेत अहोरात्र सेवा देणारे योध्दा डॉक्टर, पोलीस, परिचारिका, आशा वर्कर, नगर पालिका कर्मचारी आदिनां विर मरण आल्यास त्यांना शहीदचा दर्जा देण्या करीता अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चंद्रपूरच्या वतीने आ. सुधीर मुनगंटीवार माजी वित्त, नियोजन, वने तथा पालक मंत्री यांना मागणी करण्याचे निवेदन देण्यात आले. कारण या महामारीचा बळी चंद्रपूर जिल्हयातील एक 37 वर्षाचा तरुण कोरोना योध्दा डॉ. सुनिल टेकाम वैद्यकीय अधिकारी, वरोरा यांचा दि. २१/ ०८/ २०२० रोजी कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.

डॉ. टेकाम यांनी प्रामाणिकपने आपले कर्तव्य पारपाडत अक्षरशा या कोरोना काळात कोरोना रूग्णाची सेवा करण्यात स्वतःला वाहून घेतले होते. त्यांच्यामागे त्यांची पत्नी व दिड वर्षाचे बाळ आणि वृद्ध आई-वडिल आहेत. डॉ. टेकाम हे घरातील एकमेव आधार होते व त्यांच्या कुटुंबाची जवाबदारी त्यांच्या खांदयावर होती. ते शासकीय कर्तव्यावर असतांना कोरोनाची लागण झाली. व त्यांना विरगती प्राप्त झाली. जिल्हा प्रशासनाने त्यांचा कार्याचा सन्मान म्हणून कोविड सेंटर मधून शव बाहेर काढल्यानंतर आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा त्यांचावर टाकून व फुलांचा वर्षाव करू यथोचित सन्मान केला. एखादया कोरोना योध्दाचा अशाप्रकारे सन्मान करणे पुर्णपणे उचित असून अशा कर्तव्यदक्ष डॉ सुनिल टेकाम यांना शहीदाचा दर्जा देऊन त्यांचा उचित सन्मान महाराष्ट्र शासनाचा मार्फतीने करण्यात यावा म्हणून शहीदाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करन्याचे निवेदन आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना अ. भा.आदिवासी विकास परिषद, चंद्रपूर, चे जिल्हाध्यक्ष युवा कृष्णा मसराम, सौ. चंद्रकला सोयम जिल्हा महिला अध्यक्ष तथा नगर सेविका, धनराज कोवे जिल्हा अध्यक्ष विध्यार्थी आघाडी, आफ्रोट चे विजय कुमरे, तसेच डॉ. प्रवीण येरमे, डॉ. शारदा येरमे, नागो मेश्राम आणि इतर सामाजिक विविध संघटनांच्या वतीने देण्यात आले. तेव्हा आ. मुनगंटीवार यांनी विमा निधी विना विलंब टेकाम यांचा कुटुंबीयास देण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येवून नये उपहास होवू नये, करीता डॉ. टेकाम यांच्या पत्नी ह्या कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय सेवा देत असल्यामुळे त्यांना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात ना. राजेश टोपे आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला तेव्हा आरोग्य मंत्री यांनी सकारात्मक भूमिका घेण्यात येईल असे आश्वासन आ. मुनगंटीवार यांना दिले.