“मयत” वृत्तपत्र विक्रेत्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारा बाजीराव दांगट (सेठ)

0
136

ठाणे

मयताच्या टाळूवरचे लोणी खाणारा बाजीराव दांगट सेठ

ज्यावेळी लॉकडाऊन मुळे वृत्तपत्र वितरण बंद होते त्यावेळी सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना ३ लाखांचा जीवन विमा व कोरोना होऊन एडमिट झाल्यावर 15000 त्वरित मदत निधी देण्याचे सर्व कंपनीकडून ठरवले होते. आणि तशी हमी बाजीराव दांगट यांनी स्वतः घेतली होती. परंतु जर आपण बघितले तर मयत झालेल्या 11 जनापैकी फक्त तीन 3 लोकांना 135,000 रुपये व ज्यांना लागण झाली होती अश्या 14 विक्रेत्यांना 10000 रुपये देण्यात आले. जे वृत्तपत्र विक्रेते कोरोना महामारी काळात व्यवसाय करण्यास तयार नव्हते अशावेळी फोरमने इन्शुरन्स आणि मेडिक्लेम लालूच दाखवून वृत्तपत्र विक्रेत्यांना व्यवसाय चालू करण्यास सांगितल. या सर्व विषयात पुढाकार घेणारे फोरम चे अध्यक्ष बाजीराव दांगट नेहमीच अग्रेसर होते. परंतु कोरोना मूळे जे वृत्तपत्र विक्रेते मयत झालेत व जे बाधित होते त्यांना ठरल्याप्रमाणे 300000 व 15000 रुपये दिले गेले नाहीत. कोणत्या कंपनीकडून किती रुपये मिळाले व कोणी दिले नाहीत याची काहीही कल्पना वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रतिनिधींना नाही. जे स्वतःला वृत्तपत्र विक्रेत्यांची वाली समजणारे नेते या विषयात बोलण्यास सुद्धा तयार नाहीत. ठरल्याप्रमाणे जर मोबदला विक्रेत्यांना दिला नाही तर त्यांच्या ऑफिसेसमोर आंदोलन करून देण्यास भाग पाडू.
सर्व कंपन्यांनाही बाजीराव दांगट हे असे भासवतात की मुंबई ठाण्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेते जणू त्यांच्या खिशातच आहेत. आणि या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या नावाने स्वतः मलिदा लाटत असतात. आणि जर कोणी यांच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न केला तर लगेच दबाव आणण्याचा प्रयत्न ते नेहमी करतात. अशा ह्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या नावाने सर्व वृत्तपत्र समूहाकडून मलिदा लाटणार्‍या बाजीराव दांगट यांचा करावा तितका निषेध कमीच आहे. यालाच’ मयताच्या टाळूवरचे लोणी खाणे’ म्हटले तर वावगे ठरणार नाही.
दत्ता घाडगे
अध्यक्ष
ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन.
(संलग्न- महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here